AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर भाजप खासदार मेधा कुलकर्णीना पाहिला विकास आणि वास्तव यामधला भयानक फरक

Pune News : केंद्र सरकारकडून नेहमीच विकासाचे दावे केले जातात. भाजपच्या पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विकास आणि वास्तव यामधला भयानक फरक त्यांनी पाहिला.

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर भाजप खासदार मेधा कुलकर्णीना पाहिला विकास आणि वास्तव यामधला भयानक फरक
Medha Kulkarni
| Updated on: Apr 23, 2026 | 1:19 PM
Share

“पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बाबत वारंवार तक्रारी येत होत्या. या सगळ्या तक्रारी बाबत पाहणी केली. अनेक त्रुटी लक्षात आल्या आहेत. डीआरएमला भेटणार आहे. त्यांना काही लोकांबाबत तक्रारी दिल्या होत्या, यंत्रणा कुठलीही नाही. मोठ्या प्रमाणात सुरक्षा त्रुटी रेल्वे स्टेशनवर जाणवल्या आहेत. पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट काढून आले. पण अनेकजण विना तिकीट या ठिकाणी फिरत आहेत, घटना घडून गेल्यानंतर आता अनेक त्रुटी जाणवल्या आहेत” असं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या. “अनेक व्यसनाधीन लोक आढळले आहेत. व्यसनी लोक येत आहेत. इथ दुर्घटना झाल्या आहेत. चोऱ्या,अत्याचार घडले आहेत. या सगळ्या त्रुटींबाबत केंद्राला अहवाल देणार” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. केंद्राकडून रेल्वे स्टेशन्सचा विस्तार, विकास सुरु असल्याचा नेहमीच दावा केला जातो. पण आज मेधा कुलकर्णींना विकास आणि वास्तव यातला फरक दिसून आला.

“अनेक तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देणार. त्यांच्या चर्चेतून समाधानकारक मिळाले तर ठीक. पुणे रेल्वे स्टेशनवर कुठलीही तपासणी व्यवस्थित होत नाही. गरजूंना स्टॉल दिले जावे. रेल्वे स्टेशन वर अशी यंत्रणा होऊ शकते का, हे पहावे लागेल. काही ठराविक ब्रँड दिले आहेत. रेल्वे स्टेशनवर दारुडे आणि ड्रग्स घेणारे लोक पहायला मिळाले. याला दोषी असणाऱ्यावर कारवाई मागणी करणार” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

‘आओ जाओ घर तुम्हारा’

“पुणे रेल्वे स्टेशन पाहणीची माहिती वरपर्यंत पोहचवणार आहे. अक्षरश: या पुणे रेल्वे स्टेशनवर भोंगळ कारभार आहे. सुरक्षा रिपोर्ट केंद्राला देणार. केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे या सगळ्या अडचणी मी लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. इथे टीसी उपलब्ध नाही, आओ जाओ घर तुम्हारा रेल्वे स्टेशनवर सुरू आहे. या ठिकाणचे रेल्वे अधिकारी, पोलिस अधिकारी यांचा हलगर्जीपणा याला जबाबदार आहे त्याची यादी देणार. सुरक्षा व्यवस्था वाढली पाहिजे. अनेक अपहरणं,अत्याचार,चोऱ्या घटना वांरवार घडत आहेत. आजपर्यंत दुर्लक्ष ज्यांनी केलं ते जबाबदार आहेत” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?