ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळं पुण्यात निर्बंध पुन्हा कडक ; चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांना संधी

| Updated on: Nov 30, 2021 | 11:42 AM

चित्रपट गृह, नाट्य गृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहेत.

ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळं पुण्यात निर्बंध पुन्हा कडक ; चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांना संधी
pune corona
Follow us on

पुणे- शहरातील नाट्यगृह, चित्रपट गृहांची आसनक्षमता एक डिसेंबरपासून 100 टक्के सुरू होतील, तसेच सवाई गंधर्व महोत्सवास परवानगी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. मात्र, राज्य शासनाचे नवे आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, चित्रपट गृह आणि नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश दिले जाणार आहेत. खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 25 टक्के उपस्थिती परवानगी आहे. त्यामुळे बंधन शिथिल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन व सांस्कृतीक क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले. त्यामध्ये 50 टक्केच परवानगी असल्याने महापालिका काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता दिलासा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास कोरोनाचे निर्बंध, शर्ती वाढविण्याचे अधिकार दिले आहेत. यासाठी 48 तास आधी पूर्व सूचना देणे बंधनकारक आहे.

पुण्यात तीन दिवसातच पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ओमिक्रोममुळे पुन्हा एकदा पुण्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री नव्याने हे आदेश काढण्यात आले आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका

ओमिक्रोमच्या पार्श्वभूमिकेवर पुण्यात नव्याने लावण्यात आलेल्या निर्बंधांचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे. येत्या २ डिसेंबर पासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. याबरोबरच खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी १ हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील तर त्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी लागणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. याबरोबरच संपूर्ण खुल्या जागेत कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या ‘एका’ प्रवाश्यावर महापालिकेचे विशेष लक्ष

Chandrakant Patil | मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपला पक्ष संपवला, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका

19 वर्षीय तरुणी रस्त्यात मृतावस्थेत, शेजारी रक्तरंजित चाकू आणि विषाची बाटली, प्रियकर ताब्यात

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.