तीन दिवसांपूर्वीच नानांना फोन केला… काय बोलणं झालं?; रोहित पवार स्टेजवरच रडले
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहताना भावना व्यक्त केल्या. तीन दिवसांपूर्वी नानांशी फोनवर झालेल्या संवादाची आठवण सांगताना रोहित पवार स्टेजवरच रडले. नाना पाटेकर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास तयार होते, असे त्यांनी सांगितले.

आपल्या अभिनयातून सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीच नव्हे तर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. नाना पाटेकर केवळ बॉलिवूडचे हिरो नव्हते तर ते रिअल हिरो होते. त्यांनी सामाजिक कार्यातही स्वत:ला झोकून दिलं होतं. आयुष्य संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नाना पाटेकर यांनी सावरण्याचं काम केलं होतं. देशात किंवा राज्यात कोणतीही समस्या उभी राहिली तर त्यावर नाना परखडपणे व्यक्त व्हायचे. पुण्यात सध्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनालाही नाना पाटेकर पाठिंबा देणार होते. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ही माहिती दिली. ही माहिती देताना रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले.
आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच नाना पाटेकर यांच्याशी तीन दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली. नाना पाटेकर आज दुर्देवाने सोडून गेले. नानांचं कलाक्षेत्रात मोठं काम होतं. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. या सिनेमातून त्यांनी नेहमीच सामाजिक संदेश दिला. सिनेमातून चांगला संदेश जावा असा त्यांचा प्रयत्न असायचा. सकाळी उठल्यावर नाना गेल्याची बातमी कळाली. धक्का बसला. आमच्या कुटुंबाशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांची अकाली एक्झिट वेदनादायी आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अरे ते आपलेच विद्यार्थी आहेत
तीन दिवसापूर्वी मी त्यांना फोन केला होता. एका मित्राच्या माध्यमातून त्यांना विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुम्हाला पाठिंबा द्यायला यावं लागेल, असं मी त्यांना म्हटलं होतं. त्यावर तुला सांगायची गरज नाही. हे सर्व विद्यार्थी आपलेच आहेत, असं नाना पाटेकर म्हणाले होते, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
लोक मला प्रेमाने भेटतात
मी जे काही सामाजिक काम करतो, ग्रामीण भागात काम करतो, ते समाजासाठीच करतो. जिथे पाणी कमी आहे, तिथे ओढा खोलीकरण करत आहोत. तिथे असलेल्या लोकांना कामाची जाणीव असते. आपल्यासाठी काम छोटं असलं तरी पाणी अडल्याने चार पाच विहिरी शेतकऱ्यांच्या भरल्या जातात. मी जेव्हा जेव्हा गावांमध्ये लोकांना भेटायला जातो, तेव्हा लोकांकडून आपुलकी प्रेम मिळते. मला वेगळी प्रेरणा मिळते. घरात काही नसलं तरी घरात आणि शेतात पिकणारं ज्वारी, तांदूळ, बाजरी लोक मला बांधून देतात. पैशात त्याची किंमत करता येणार नाही. पण आपलुकी आणि प्रेमाची किंमत मला लोकांकडून मिळाली, असं नाना म्हणायचे, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.
अन् अश्रू अनावर झाले
आज नाना असते तर काय चाललंय महाराष्ट्रात? असं म्हणाले असते. मी त्यांना आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबासोबत पवार परिवार आहेच. पण सर्व समान्य परिवारीतील एमपीएससीचे विद्यार्थी त्या परिवारासोबत आहे. नानांनी पेरलेला विचार, संघर्ष, रोखठोकपणा आणि रोखठोकपद्धतीने काम करण्याची पद्धत हे विद्यार्थी पुढे घेऊन जातील, असं सांगताना रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले. भर स्टेजवरच रोहित पवार यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.