Nana Patekar : त्या मुलाखतीने हादरले… कार घ्यायचं सोडून शेतकऱ्यांना वाटले 1.5 कोटी; असे होते नाना पाटेकर
नाना पाटेकर यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे. 75 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. एक कसदार अभिनेता आणि संवेदनशील माणूस म्हणून ते ओळखले जात होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोलाचे काम केले, NAAM फाउंडेशनद्वारे अनेकांना मदत केली.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने देश सुन्न झाला आहे. नाना पाटेकर यांनी अचानक एक्झिट घेतली यावर कुणाचा विश्वासच बसत नाहीये. त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एक कसदार अभिनेता म्हणून नाना लोकप्रिय आहेतच, पण एक संवेदनशील माणूस म्हणूनही नाना अनेकांच्या मनात घर करून आहेत. नानांनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. अनेकांना सढळ हस्ते मदत केली. अनेक कुटुंब सावरली. शेतकऱ्यांसाठी तर नाना रिअल हिरो होते. नानांनी गोरगरिबांना पैसा वाटताना कशाचाही विचार केला नाही. आपल्या स्वप्नांना मुरड घालून त्यांनी लोकांना सढळ हस्ते मदत केली.
काही अभिनेते सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर मोठमोठे डायलॉग बोलून पडदा गाजवतात, नावलौकीक मिळवतात. पण समाजासाठी काहीच करत नाही. नाना पाटेकर त्यातले नव्हते. नानांनी सिनेसृष्टीतील सामाजिक जाणीव असणारे निळू फुले, श्रीराम लागू आणि विक्रम गोखले यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवला. म्हणूनच आज नानांच्या जाण्याने गावागावावर शोककळा पसरली आहे. आज पहाटे 5.20 वाजता नानांची प्राणज्योत मालवली. गोव्यात त्यांचं निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे संपूर्ण देशावरच शोककळा पसरली आहे.
मुलाखत पाहून हादरलोच
लल्लनटॉपला नाना पाटेकर यांनी मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या स्वप्नाला कशी मुरड घातली याचा किस्सा सांगितला होता. मला नवी कार खरेदी करायची होती. त्यासाठी मी 1.5 कोटी रुपये जमा केले होते. एक नवी कार खरेदी करू असा विचार केला. संध्याकाळी मी घरात बसून टीव्ही पाहत होतो. त्यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची मुलाखत सुरू होती. एका महिलेने तिचा नवरा गमावला. एका मुलीने तिचा बाप गमावला. आईने मुलगा गमावला. त्यांची मुलाखत सुरू होती. त्यांच्या चेहऱ्यावर बाप मेला… मुलगा मेला… नवरा मेला… त्यापेक्षा रात्रीपासून भुकेल्या असल्याचं दिसत होतं. त्या ज्या पद्धतीने बोलत होत्या, ते ऐकून मी हादरलो. म्हटलं, आपण का कार खरेदी करावी? मी माझा मित्र मकरंद अनासपुरेंना फोन केला. ज्या 1 हजार शेतकऱ्यांनी जीवन संपवलं त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15-15 हजाराचा चेक द्या. 1.5 कोटी रुपये संपेल, असं नाना पाटेकर म्हणाले.
दोन पर्याय, एक निवडला
एकीकडे कार खरेदी करण्याचं स्वप्न होतं. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरातील दु:ख होतं. तिथे चूल पेटवणंही मुश्किल होतं. नानाकडे त्यावेळी दोनच मार्ग होते. एक तर मनपसंद कार खरेदी करणं. दुसरं म्हणजे एक हजार शेतकऱ्यांना मदत करणं. नानांनी दुसरा पर्याय निवडला. कार खरेदी करण्याचा बेत रद्द केला. आणि 1.5 कोटी रुपये शेतकरी कुटुंबाला वाटले.
अन् गावागावात गेले
त्यानंतर नाना यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत NAAM फाउंडेशन सुरू केलं. गावागावात जाऊन आयुष्य संपवलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यांना धीर दिला. आर्थिक मदत केली. तसेच त्यांना शिलाई मशीन वगैरे साहित्य देऊन रोजगार निर्माण करून दिला. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचन प्रकल्प सुरू केले. शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदत देऊन चालणार नाही, त्यांना उत्पन्नाचा शाश्वत मार्ग शोधून देण्याचं काम केलं.
