AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत रुपाली चाकणकरांनी साजरी केली ‘भाऊबीज’

दिवाळीच्या सणातही एखाद्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली तर जिवाची पर्वा न करता, स्वतः च्या कुटुंबियांचा विचार न करता हे अग्नीशामक दलाचे जवान आपले कर्तव्य पार पडतात. त्यामुळे आजचा भाऊबीजेचा सण हा त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासारखा- रुपाली चाकणकर

अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत रुपाली चाकणकरांनी साजरी केली 'भाऊबीज'
रुपाली चाकणकर
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 2:48 PM
Share

पुणे – वर्षातील ३६५ दिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना ओवाळून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपली भाऊबीज साजरी केली. गेल्या अनेक वर्षांपासून भाऊबीजेचा सण हा सर्वप्रथम अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत साजरा केला जातो. त्यानंतरच कुटुंबीयांबरोबर भाऊबीज साजरी केली जाते, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. भोई प्रतिष्ठानतर्फे या भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या सणातही एखाद्या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली तर जिवाची पर्वा न करता, स्वतः च्या कुटुंबियांचा विचार न करता हे अग्नीशामक दलाचे जवान आपले कर्तव्य पार पडतात. त्यामुळे आजचा भाऊबीजेचा सण हा त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासारखा असल्याची भावना रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

महिलांनी टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कामाला सुरुवात केली आहे. बीट मार्शल, निर्भया पथक, भरारी पथके ऑक्टिव्ह केली आहेत. शहरी भागांसाठी 1091, तर ग्रामीण भागांसाठी 112हा टोला फ्री क्रमांक आहे. महिलांना ज्या ज्या वेळी असुरक्षित वाटेल तसेच घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरत असतील आणि पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकत नसतील तेव्हा तेव्हा या टोल फ्री क्रमांकाचा वापर निश्चित करावा,  असे आवाहन चाकणकरांनी केले आहे.

मनोधैर्य योजना व निर्भया फंड त्रुटी दुरुस्त करणार मनोधैर्य योजना व निर्भया फंड निधीबाबत मागील तीन -चार दिवसांपूर्वीच राज्यात सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद ,पंचायत समिती अगदी ग्रामसेवकांनाही सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी बालविवाह घडतात त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांच्या टीममध्ये सहभागी होऊन ही यंत्रणा राबवावी असे सांगण्यात आले आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत महिलांना मदत पोहचवली जाईल तसेच या योजनेत जिथे जिथे त्रुटी आढळतील तिथे राज्य महिला आयोग सुधारणा करेल. राज्यातील महिला अत्याचाराचे प्रकार थांबवण्यासाठी राज्य महिला आयोग अधिक सक्षमपणे काम करेल असेही चाकणकर म्हणाल्या.

हे ही वाचा :

महापौर किशोरी पेडणेकरांनी साजरी केली भाऊबीज; मुंबईकरांना दिल्या शुभेच्छा

पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले

खंडणी वसुलीप्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच; 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप