AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकरच त्या रॅकेटच्या सूत्रधार, काय केली सेटलमेंट, रुपाली ठोंबरे पाटलांचा बॉम्ब गोळा, अटक न केल्यास हायकोर्टात जाणार

Rupali Thombre Patil on Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर याच अशोक खरात याच्या लैंगिक शोषण रॅकेटच्या सूत्रधार आहेत. त्यांना अटक करा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीतील दोन महिला नेत्यांमध्येच आता जुंपल्याचे दिसून येत आहे.

रुपाली चाकणकरच त्या रॅकेटच्या सूत्रधार, काय केली सेटलमेंट, रुपाली ठोंबरे पाटलांचा बॉम्ब गोळा, अटक न केल्यास हायकोर्टात जाणार
रुपाली चाकणकर, अशोक खरात, रुपाली पाटील ठोंबरेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 22, 2026 | 10:17 AM
Share

Rupali Thombre Patil on Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच अशोक खरात याच्या लैंगिक शोषण रॅकेटच्या सूत्रधार आहेत. खरातच्या प्रत्येक कृत्यात चाकणकर यांचा सहभाग दिसतो. SIT कडं हे सगळं आलं आहे. चाकणकर यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी अजितदादा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली. चाकणकरांवर कारवाई झाली नाही तर हायकोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

चाकणकर याच मुख्य सूत्रधार

आजपर्यंत जवळ जवळ २५० ते ३०० व्हिडिओ आले आहेत. भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.अत्यंत किळसवाणे प्रकार त्याने केले. या सर्व गोष्टीला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या आहेत. त्यांच्या संगनमताने त्याने हे अत्याचार केल्याचे प्रथमदर्शनी आपल्याला दिसत आहे. त्याच्या मुळे चाकणकर यांना या प्रकरणात सह सूत्रधार करून गुन्हा नोंदवावा. भोंदूबाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. खरातच्या प्रत्येक कृत्यात चाकणकर यांचा सहभाग दिसतो. SIT कडं हे सगळं आलं आहे. चाकणकर यांना मुख्य सूत्रधार करून तातडीने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी रूपाली ठोंबरे पाटील यांनी केली.

ज्या भोंदूबाबाने हे सर्व प्रकार केले. हे व्हिडिओ तयार केले. त्या दोन व्यक्ती होत्या. त्या दोन व्यक्तींनी खरात याला व्हिडिओवरून ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. एक वर्षापूर्वी एका पत्रकाराने या प्रकरणाचा भांडाफोड केला. तेव्हा चाकणकर यांनी त्या पत्रकाराला धमक्या दिल्या असे चाकणकर म्हणाल्या.

सेटलमेंट करणारा तो सामाजिक कार्यकर्ता कोण?

महिलांवर अत्याचार झाला त्याला चाकणकर जबाबदार आहे. भोंदू बाबाला वाचवण्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर केला. एसआयटीच्या तापासात सर्व आले आहे. चाकणकरांना सह आरोपी करा. याप्रकरणात खरात याला व्हिडिओवरून दोघांनी ब्लॅकमेल केले. तेव्हा पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने सेटलमेंट करण्यात आली असा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला. जर आयएएस अधिकाऱ्यांनी खरात याला गुन्ह्यात मदत केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

तर हायकोर्टात जाणार

याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी महिलांना तातडिने दिलासा दिला. महिला आयोगाच्या अध्यक्षाना राजीनामा द्यायला लावला. मुख्यमंत्री चाकणकर यांच्यावर कारवाई करतील. कारवाई केली नाही तर हायकोर्टात जाणार असल्याचा इशारा ठोंबरे यांनी दिला. या खरातने 800 कोटींची माय कशी जमवली असा सवाल त्यांनी केला. तर तृप्ती देसाई यांनी कोर्टात जाऊन खरातच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे असे आवाहन ही त्यांनी केले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी