BREAKING : महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता, संभाजीराजे यांचं सर्वात मोठं विधान

छत्रपती घराण्याचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी मोठं विधान केलंय. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

BREAKING : महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता, संभाजीराजे यांचं सर्वात मोठं विधान
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 5:27 PM

पुणे : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. पण तरीही सत्ता कुणाची येईल, याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. हिमाचलची सध्याची परिस्थिती पाहता तिथे सत्तेसाठी राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसात तिथल्या राजकीय घडामोडींना वेग येणार हे निश्चित आहे. या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय घडामोडी घडत असताना इकडे महाराष्ट्रातही त्याला समांतर अशा काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांकडून पुणे बंदची हाक देण्यात आलीय. पुण्यात 13 डिसेंबरला बंद पाळला जाणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आणि छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलंय. त्यांनी थेट महाराष्ट्र बंदचे संकेतच देवून टाकले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोषारीं विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा प्रवास सुरु झालाय, असं मोठं विधान संभाजीराजे यांनी केलंय. चिंचवड आणि जालना येथील बंद यशस्वी करून याची सुरुवात केलीय. जे छत्रपती शिवरायांना मानत नाहीत, त्यांचा कडेलोट होतो. याची सर्वांना कल्पना आहे.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा राज्यपाल आम्हाला नकोय. त्यांना जिकडं पाठवायचं तिकडं पाठवून द्या. आम्हाला ते महाराष्ट्रात नको, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजेंनी पिंपरीत बोलताना दिली.

“आता ह्यांनी राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. याचा प्रवास पिंपरी आणि जालनामधून सुरू झालाय”, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.