AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Alert| 28 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीत; संशोधन झाल्याशिवाय ठोस सांगता येणार नाही – डॉ. प्रदीप आवटे

पुणे शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाबरोबरच स्थानिक प्रशासनानेही निर्बंध कडक केले आहेत. शहरात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. सद्यस्थितीला पुणे जिल्ह्यात 13 लाख 93हजार590 नागरिकांचा डोस घेणे बाकी आहे

Omicron Alert| 28 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीत; संशोधन झाल्याशिवाय ठोस सांगता येणार नाही - डॉ. प्रदीप आवटे
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 11:30 AM
Share

पुणे – कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमीक्रॉमचा भारतात शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कर्नाटकमध्ये ओमीक्रॉम दोन रुग्ण आढळल्यानंतर महारष्ट्रातही मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली  आहे. महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह 28 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही मध्ये पाठवण्यात आलेत.

कर्नाटकमध्ये ज्या डॉक्टरांच्या शरीरात ओमीक्रॉनचे विषाणू सापडलेत त्यांची कोणतेही ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. कदाचित ते कोणाच्या तरी संपर्कात आले असतील. दक्षिण आफ्रिकेच्या आधी ओमीक्रॉन आपल्याकडं आल्याची शक्यताही असेल, पण यावर पूर्ण संशोधन झाल्याशिवाय ठोस काही सांगता येणार नाही.  दक्षिण आफ्रिकेतून आलेला जो रुग्ण ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आहे, त्याच्या संपर्कात आलेले जवळपास 200 हून अधिक लोक हे निगेटिव्ह आलेत, ही सकारात्मक बाब आहे. तरीही पुढील दोन आठवड्यात याबाबत ठोस बोलता येईल अशी माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये ओमीक्रॉनचे दोन रुग्ण भारतातील कर्नाटक राज्यात आढळलेला ओमीक्रॉनच्या दोन रुग्णांपैकी एका दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तर दुसरा तिथलाच स्थानिक डॉक्टर आहे.  सर्वात महत्त्वाचे या दोघांचेही लसीचे दोन्ही डोसपूर्ण झाले आहे. तरीही या दोघांना ओमीक्रॉनची लागण झाली आहे. यामध्ये ओमीक्रॉनची लागण झालेल्या डॉक्टरने कोणत्याही प्रकारची परदेश वारी केली नसल्याचे समोर आले आहे. मात्र या डॉक्टरच्या संपर्कात आलेले पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

इतक्या लाख लोकांचा दुसरा डोस बाकी पुणे शहरात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाबरोबरच स्थानिक प्रशासनानेही निर्बंध कडक केले आहेत. शहरात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. सद्यस्थितीला पुणे जिल्ह्यात 13 लाख 93हजार590 नागरिकांचा डोस घेणे बाकी आहे. शहरात नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांमध्ये 50  टक्के आसनक्षमता तर खुल्या मैदानांमध्ये 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. मॉलमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना दोन डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Nagpur Corona चिंतेत भर, 13 पॉझिटिव्ह-53 सक्रिय, तीन आठवड्यांतील उच्चांक

Nagpur Administration भीती ओमिक्रॉनची, प्रशासन लागले कामाला, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरू करण्याच्या सूचना

हुश्श! दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह, औरंगाबादला दिलासा, आज आणखी 18 जणांचे अहवाल येणार!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.