Sangli District Central Cooperative Bank Election : शरद पवार यांना मोठा धक्का, सांगलीत उमेदवाराचा अवघ्या 4 मतांनी पराभव; पवार गटात खळबळ

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित घोरपडे यांनी पवार गटाच्या उमेदवाराला अवघ्या 4 मतांनी पराभूत केले. भाजपचे गोपीचंद पडळकर यांचाही दणदणीत विजय झाला. या निकालांमुळे बँकेच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, प्रस्थापित नेत्यांना आव्हान मिळाल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Sangli District Central Cooperative Bank Election : शरद पवार यांना मोठा धक्का, सांगलीत उमेदवाराचा अवघ्या 4 मतांनी पराभव; पवार गटात खळबळ
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 12:43 PM

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. या निवडणुकीत माजी मंत्री अजित घोरपडे यांचा मोठा विजय झाला आहे. अजित घोरपडे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार टी. व्ही. पाटील यांचा अवघ्या 4 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांनी विजयासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. ते विजयी होतील असा कयासही वर्तवला जात होता. पण अटीतटीच्या लढाईत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत कवठे महाकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे टी. व्ही. पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना 37 मते पडली. तर टी. व्ही. पाटील यांना 33 मते पडली आहेत. घोरपडे यांचा 4 मतांनी विजय झाला आहे. तर मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप आमदार सुरेश खाडे याचे समर्थक अनिल शेगुनशे यांचा पराभव केला आहे.

Loading...

पडळकर यांची एन्ट्री

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना 54 मते पडली आहेत. तर महाविकास आघाडीची विनोद पवार यांना 34 मते पडली आहेत. जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजय झाला आहे. गोपीचंद पडळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे विनोद पवार यांच्यात झाली लढत झाली होती. या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पडळकरांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर पडळकर समर्थकांचा जल्लोष झाला. अखेर जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकर यांची दणदणीत एन्ट्री झाली आहे.

अलिबाबाच्या गुहेत शिरकाव

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रस्थापितांच्या चिरेबंद वाड्याला, गोपीचंद पडळकर यांच्या विजयाने तडा गेला आहे. वाळव्याच्या नेत्याने जिल्हा बँक अलिबाबाची गुहा बनवली होती, पण या अलिबाबाच्या गुहेच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचा वाघ आला आहे. त्यामुळे वाळव्याच्या गब्बर सिंगाने सावध व्हावं, अशी प्रतिक्रिया आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. यावेळी खोत यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर निशाणा साधला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us