
Pune-Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election 2026: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपच्या जोरदारन मुसंडीने सर्वच समीकरणं बदलून गेली. मुंबईत ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडालेला असतानाच तितकीच जोरदार चर्चा पवारांची पॉवर कमी झाल्याची सुद्धा होत आहे. महायुतीसोबत सत्तेत असलेल्या अजितदादांना महापालिका निवडणुकीत चमकदार कामगिरी बजावता आली नाही. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला राज्यातील महापालिकेत इतक्या ठिकाणी भोपळे मिळाले की विचारता सोय नाही. त्यांच्या होमपिचवरही या पक्षाला सर्वात मोठा दणका बसला. दोन्ही पवारांच्या विश्वासहर्तेपासून नेतृत्वावरच या निकालाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता यापुढे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? दोन्ही पक्षांचे अस्तित्व काय असेल. शरद पवार आता महायुतीसोबत जाणार का? राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार का? असे अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतीलच. पण या दोन पवारांच्या भविष्याची चर्चा सुरू झाली हे नक्की.
बालेकिल्ला ढासळला
रवी राणा यांचा थेट मोठा गेम, अखेर..
Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांचे मनसे सैनिकांना मोठा आवाहन, थेट म्हणाले...
Mumbai Election Result 2026 : मुंबईतील विजयी उमेदवार घेणार एकनाथ शिंदे यांची भेट
Raj Thackeray On Mumbai Election Result 2026 : मनसे-उद्धव ठाकरे शिवसेना युती तुटणार का? निकालानंतर राज ठाकरेंचे पहिले संकेत काय?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
पुण्यात एकूण १६५ जागांपैकी भाजपने १२० जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पदरात २६ जागांचा जोगवा पडला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १२८ जागांपैकी भाजपने ८४ धावांची सलामी देत दोन्ही राष्ट्रवादीचा धुव्वा उडवला. अजितदादांच्या राष्ट्रवादीला इथं ३७ धावांवर आटोपतं घ्यावं लागलं. तर थोरल्या साहेबांच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही.
तेलही गेले तूपही गेले
काकांनी आता थांबावे या विधानापासून ते काकांच्या नेतृत्वाची आणि अनुभवाची गरज असल्यापर्यंत पुतण्याच्या दोन भावनिक छटा राज्याने पाहिल्या. त्यामुळे वितुष्ट आले असतानाही पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुकीत काहीच हाती लागले नाही. या महापालिकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपचा गेम करण्याचा प्लॅन दादांच्या अंगलट आला. मतदारांना दादांनी अनेक आश्वासनं दिली. भाजपवर विखारी टीका केली. भाजपला सोलपटून काढले. पण तेलही गेले आणि तूपही गेले, पुढे हाती धुपटणे आले असं म्हणणं शहाणपणाचा ठरणार नाही. कारण दादा हे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. दादांना राजकारणात प्रदीर्घ अनुभव आहे. पण विधानसभा, नगरपालिका-नगरपंचायतीमधील स्ट्रॅटर्जी जशी कामी आली, तसा झंझावात त्यांना राज्यात राखता आला नाही हे नक्की. पण अजितदादांना हलक्यात घेणं चूक ठरेल. त्यामुळेच भाजपने प्रचारतही आणि निकालानंतरही दादांविरोधात विखार दाखवला नाही, यातच खरं त्या पराभवाची भविष्यातील गोळाबेरीज दडलेली आहे. भाजपला दादांना दुखवायचं नाही. तर दादांनाही सत्तेतून बाहेर पडायचं नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत दादा या पराभवाचं उट्टे काढतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
राष्ट्रवादीला ‘संजीवनी’ शरद पवारच देतील
राज्यातील 29 महापालिकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी भोपळेच फोडता आलेले नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेले अनेक नेते आहेत. पण त्यांच्या पट्ट्यात राष्ट्रवादीला करिष्मा दाखवता आला नाही. भाजपच्या झंझावात हा पक्ष वाहून गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. शरद पवार यांनी पुतण्याला सोबत घेत पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन राष्ट्रवादी, दोन पक्ष, दोन चिन्ह असा ही प्रयोग करून पाहिला. पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. एकाही महापालिकेत त्यांना दोन अंकी सरदार उभे करता आले नाही. तर जिथे ते इतर पक्षांसोबत गेले, तिथे अपक्षांपेक्षा त्यांची अवस्था बिकट झाली. शरद पवार हे आजही राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जातात. एकीकडे पुतण्याचे नेतृत्व तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व अशी तारेवरची कसरत त्यांना या महापालिका निवडणुकीत करावी लागली.
गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही पक्ष एकत्र करण्याची चर्चा जोमात आहे. पण चर्चा आणि कृती याची जोड अद्याप दिसलेली नाही. दोन्ही राष्ट्रवादींना नवसंजीवनी देण्याची ताकद आजही शरद पवार यांच्याकडे असल्याचे अनेक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मत आहे. तुतारी वाजली नसली आणि घड्याचे काटे वेगाने फिरले नसले, तरी पवारांची पॉवर कमी झाली असे म्हणणे रास्त ठरणार नाही. कधी कधी चार पावलं पुढं जाण्यासाठी दोन पावलं मागं यावं लागतं म्हणतात. हे राजकारण आहे आणि ते पवारांना इतरांपेक्षा अधिक चांगलं समजतंच नाही तर उमगतं हे कुणीही विसरू नये असे इतिहास सांगतो.