AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; मंदिर आंदोलनावरून शरद पवारांनी फटकारले

भाजपने केलेल्या मंदिराच्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे. कोरोनाच्या संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. (Sharad Pawar)

VIDEO: राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; मंदिर आंदोलनावरून शरद पवारांनी फटकारले
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 6:38 PM
Share

पुणे: भाजपने केलेल्या मंदिराच्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे. कोरोनाच्या संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे पालन राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे किमान त्यांच्या विचाराच्या राज्यातील नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं, अशा शब्दात शरद पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना फटकारले आहे. (Sharad Pawar attacks BJP for temple reopen agitation)

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर पवारांनी खास शैलीत भाष्य केलं. केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. आणखी काही दिवस खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार कटाक्षाने त्या सूचना पाळत आहे. मात्र अन्य घटकांची त्याबद्दल काही मते असू शकतात. त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकार जेव्हा अशी भूमिका घेतं तेव्हा कमीत कमी त्यांच्या विचाराच्या राज्यातील लोकांनी तारतम्य ठेवायची गरज होती. याबद्दल मला काही अधिक सांगायचं नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

यापूर्वी असा गैरवापर झाला नाही

ईडीच्या होत असलेल्या गैरवापरावरूनही त्यांनी टीका केली. या यंत्रणांचा आतापर्यंत या देशात असा कधी वापर झाला नव्हता. मात्र, हल्लीच्या सरकारने ही यंत्रणा विरोधकांना नमवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, राजस्थान मध्यप्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यात हेच सुरू आहे. आपण केवळ महाराष्ट्रातील कारवायांवर चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही तर हा गैरवापर इतर राज्यातही सुरू आहे, असं पवार म्हणाले.

आम्ही शेट्टींना दिलेला शब्द पाळला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं विधान परिषदेतील आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर पवारांना विचारण्यात आलं असता पवारांनी या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. ते नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादीने जी यादी राज्यपालांना दिली आहे त्यात राजू शेट्टी यांचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीत क्षेत्रात योगदान दिलं आहे. ते पाहून त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. त्याचा अंतिम निर्णय राज्यापालांकडून आलेला नाही. त्यामुळे अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची आहे. पण आश्चर्य याचं वाटतं अशी विधानं कशी केली जातात? आम्ही आमची कामं प्रामाणिकपणे केली आहेत. राजू शेट्टी यांना काय वक्तव्य करायचं असेल त्यावर भाष्य करायचं नाही. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात त्याची आम्ही वाट बघतोय, असं ते म्हणाले.

संवेदनहीन राज्यकर्ते

दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला जात आहे. त्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. लाठीचार्ज ही गंभीरबाब आहे. त्याही पेक्षा 14 महिने शेतकरी त्या ठिकाणी बसलेत. थंडी, ऊन आणि पाऊस याचा विचार न करता शेतकरी उपोषण करत आहेत. संवेदनशील राजकर्त्याने इतके दिवस अन्नदाता आंदोलन करतोय त्यांची नोंद घ्यायला हवी होती. पण दुर्देव आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. (Sharad Pawar attacks BJP for temple reopen agitation)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातच नाही इतर राज्यातही ईडीचा गैरवापर, विरोधकांना नमवण्याचा केंद्राचा प्रयत्न; शरद पवारांची टीका

‘राजू शेट्टींबाबत राज्यपाल निर्णय घेतील, 12 सदस्यांमध्ये त्यांचं नाव’; शरद पवारांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण

“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला

(Sharad Pawar attacks BJP for temple reopen agitation)

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?