पुणे : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका मांडली आहे. या बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना देण्यात आलेल्या यादीत राजू शेट्टी यांचं नाव आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. ते आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी शेट्टींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. (Raju Shetty’s name in the list of 12 MLAs appointed by the Governor)