Sharad Pawar : वयाच्या 86 व्या वर्षी आजारावर मात करुन शरद पवार पुन्हा सज्ज, कधीपासून राजकारणात होणार सक्रिय?

Sharad Pawar in Action Mode: ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत. आजारावर मात करत ते पुन्हा एकदा मार्गदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच अधिवेशन ते सहभागी होत आहेत.

Sharad Pawar : वयाच्या 86 व्या वर्षी आजारावर मात करुन शरद पवार पुन्हा सज्ज, कधीपासून राजकारणात होणार सक्रिय?
आजारावर मात करुन शरद पवार पुन्हा सज्ज, राजकारणात पुन्हा सक्रिय
| Updated on: Nov 20, 2026 | 8:32 AM

Sharad Pawar in Action Mode: ज्येष्ठे नेते शरद पवार हे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत. उपचारानंतर ते उद्या पासून सक्रिय होणार आहेत. उद्या पुणे जिल्ह्यात शरद पवार कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला धाराशिव, सोलापूर दुष्काळी दौऱ्यावर असताना त्यांची तब्येत बिघडल्याने अगोदर पुण्यातील रूबी येथे व नंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे या काळातही त्यांच्या भेटीला अनेक नेते पोहचले. उपचारानंतरही राष्ट्रवादीतील काही नेत्यांशी त्यांनी चर्चेची खलबतं केली. आता ते पुन्हा एकदा मार्गदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच अधिवेशन ते सहभागी होत आहेत.

राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच अधिवेशनात मार्गदर्शन

Loading...

उद्या शरद पवार , छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. ओतुर मध्ये राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. त्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष स्थानी शाहू महाराज असणार आहेत. महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी याच आयोजन करण्यात आलं आहे.

तीन नेते एकत्र

शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)अध्यक्ष शरद पवार उपचारानंतर पुन्हा एकदा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होत आहेत. शनिवारी राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला ते उपस्थित असतील. या अधिवेशनाचे उद्धघाटन शरद पवार करतील. अध्यक्षस्थानी शाहु महाराज असतील. विशेष म्हणजे कार्यक्रमानिमित्त शरद पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे तीनही नेते एकाच मंचावर येणार आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज ​सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्‍याकडून दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 11 वाजता कंधार येथे उभारण्यात आलेल्या 100 खांटाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करणार आहेत. शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच उदघाटन करणार आहेत. दुपारी 12 वाजता कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल मैदानावर आयोजित जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यानंतर नांदेड करांना काय मिळणार, याकडे नांदेड कराचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us