
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने-सामने होत्या. बारामतीकर सुनेला पसंती देतात की लेकीला याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. सुप्रिया सुळेंनी आपला गड कायन राखला.

सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर फॅमिली फोटोसेशन झालं. आमदार रोहित पवार यांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, तर मुलगी रेवती सुळे दिसत आहेत.

रोहित पवार यांनी फोटोंना, बारामतीतील दणदणीत विजयानंतर, एक फोटो तो बनता है असं खास कॅप्शन दिलं. शरद पवार गटाचे उमेदवारांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा पराभव केला. यामध्ये निलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांचा समावेश आहे.