AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातून किती मुली बेपत्ता झाल्या? शरद पवार यांनी आकडेवारी देत फडणवीस यांच्यांवर साधला निशाणा

2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत दावा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यांवर निशाणा साधला.

राज्यातून किती मुली बेपत्ता झाल्या? शरद पवार यांनी आकडेवारी देत फडणवीस यांच्यांवर साधला निशाणा
| Updated on: Jun 29, 2023 | 5:23 PM
Share

पुणे :  अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दावा फडणवीस यांनी केला. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार यावे म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या मुलाखतीनंतर  शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. राज्यातील कायदा अन् सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे? किती मुली बेपत्ता झाल्या आहेत? याची आकडेवारी शरद पवार यांनी सादर करत देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला.

किती मुली बेपत्ता

राज्यात शिवसेना-भाजपचे नवीन सरकारला येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात राज्यात कायदा अन् सुव्यवस्थाची परिस्थिती गंभीर झाली आहे. जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ मुली बेपत्ता आहेत. तसेच सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. राज्यात दीडवर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांची हवाली करायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

समान नागरी कायदा

समान नागरी कायद्यासंदर्भात विधी अयोगाकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे, त्याची माहिती मला नाही. मोदी यांच्याकडे नेमके काय प्रस्ताव आले आहेत, नेमक्या काय सूचना केल्या आहेत, ही माहिती समोर आली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशात समान नागरी कायद्यासंदर्भात मत व्यक्त केले होते. त्यावर ते बोलत होते. या कायद्यासंदर्भात शीख, ख्रिश्चन समाजातील लोकांचे काय मत आहेस हे जाणून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

शिखर बँकेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही लोकांची नाव आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे होते , आमचा त्याच्याशी काही संबंध नाहीय, असे शरद पवार यांनी सांगत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.