AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Teachers Constituency Election: पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच, शिंदे सेनेने भाजपचे टेन्शन वाढवले, गुरुजींचा प्रतिनिधी कोण होणार?

Pune Teachers Constituency Election: पुण्यात पदवीधर नंतर शिक्षक मतदार संघावरूनही भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी रस्सीखेच सुरू झाली आहे. गुरूजींचा प्रतिनिधी कोण होणार? यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. काय आहे मोठी अपडेट?

Pune Teachers Constituency Election: पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच, शिंदे सेनेने भाजपचे टेन्शन वाढवले, गुरुजींचा प्रतिनिधी कोण होणार?
शिंदे सेनेने भाजपचे टेन्शन वाढवले
| Updated on: Oct 01, 2026 | 12:58 PM
Share

पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुण्याची शिक्षक मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी शिंदे सेनेचे दोन नेते प्रचंड आग्रही आहेत. दोघांनी या जागेवर दावा ठोकला आहे. म्हणजे एकीकडे मित्रपक्ष भाजपशी टक्कर तर दुसरीकडे पक्षातंर्गत स्पर्धा यानिमित्ताने समोर आली आहे. गुरूजींचा प्रतिनिधी कोण होणार? यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. काय आहे पुण्यनगरीमधील मोठी अपडेट?

पुण्याच्या जागेसाठी शिंदे सेना आग्रही

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सानप आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे पुण्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. दोघांनीही या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पदवीधर मतदारसंघासह शिक्षक मतदारसंघातही धाकधूक वाढली आहे. उमेदवारी जाहीर करताना बंडाळी माजू नये याची काळजी दोन्ही पक्षांना घ्यावी लागणार आहे. पुण्यनगरीत भाजप ही जागा शिंदे सेनेला सहजासहजी सोडणार नसल्याचे समोर येत आहे. चिवटे अथवा सानप या दोघांपैकी एकासाठी सुद्धा ही जागा सोडणार नसल्याचे भाजपच्या गोटातून समोर येत आहे.

शिंदे सेना जागेसाठी आग्रही

शिवसेना पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आग्रही असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयी आज चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे शिक्षक मतदार संघानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदार संघाचीही मागणी करण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे . भाऊसाहेब आंधळकरांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मी पुणे पदवीधर मधून मोठी बांधणी केलीय त्यामुळे पक्षाने मला डावलू नये अशीही मागणीही त्यांनी केली आहे.

सचिन सानप यांची न्यायालयात धाव

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. शिक्षक मतदारांची नोंदणी अपूर्ण असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे अशी माहिती सचिन सानप यांनी दिली. गेल्या निवडणुकीत कोरोनाचा काळ असून देखील मतदार जास्त होते मात्र या निवडणुकीत शिक्षक मतदारांची संख्या घटल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व पक्षांची संवाद साधला असून शिक्षक असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे. मी देखील शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारूप मतदार यादी नव्याने तयार 

* पुणे विभागात 52,546 नवे पदवीधर मतदार

* एक लाख 18 हजार 434 मतदार नोंदणी अभावी बाद

* पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश

* पुणे पदवीधर मतदार संघाच्या अंतिम यादीमध्ये तीन लाख 7 हजार मतदार

Follow Us
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...