Shivsena : श्रीरंग बारणे शिवसेनेला लागलेलं ग्रहण, हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवा; पिंपरी चिंचवडमधले शिवसैनिक आक्रमक

| Updated on: Jul 21, 2022 | 4:16 PM

एकदा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. तुम्हाला तुमची लायकी आणि औकात कळेल. असेही श्रीरंग बारणे कधी शहरात होते, त्यांचा संघटनेला काहीही फायदा झाला नाही, असे सचिन भोसले म्हणाले.

Shivsena : श्रीरंग बारणे शिवसेनेला लागलेलं ग्रहण, हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवा; पिंपरी चिंचवडमधले शिवसैनिक आक्रमक
सचिन भोसले यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचं आंदोलन
Image Credit source: tv9
Follow us on

पिंपरी चिंचवड : श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे शिंदे गटाबरोबर का गेले हे त्यांनाच माहीत. मात्र त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान शहराध्यक्ष सचिन भोसले (Sachin Bhosale) यांनी दिले आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटदेखील झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीरंग बारणे यांच्यावर यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी टीका केली आहे. त्यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शिवसेनेला (Pimpri Chinchwad Shivsena) काहीही फरक पडणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला आहे. शिंदे गटात गेलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे. शिवसेनेतर्फे या गद्दाचांचा जाहीर निषेध सचिन भोसले यांनी केला आहे.

‘तीळमात्रही ताकद कमी झालेली नाही’

तुमच्यात हिंमत असेल, स्वत:ला खरे नेते मानत असाल आणि जनतेतून निवडून गेला असाल तर फक्त एकदा निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान त्यांनी दिले. शिंदे गटाचा पिंपरी चिंचवड शिवसेना आणि शिवसैनिकाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे येथील शिवसेनेची ताकद तीळमात्रही कमी झालेली नाही. श्रीरंग बारणे का गेले, त्यांना माहीत, काय स्वार्थ आहे हे त्यांनाच माहीत. त्यांनी इथे कोणालाही विचारलेले नाही. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक शिवसैनिकाचा विश्वासघात करून ते गेलेले आहेत. ज्यांच्या जीवावर निवडून आले, त्यांना ते विसरले आहेत. म्हणूनच त्यांना आव्हान करत असल्याचे भोसले म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘…तो पक्ष संपतो’

एकदा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा. तुम्हाला तुमची लायकी आणि औकात कळेल. असेही श्रीरंग बारणे कधी शहरात होते, त्यांचा संघटनेला काहीही फायदा झाला नाही. खासदार बारणे ज्या पक्षात जातात, तो पक्ष संपतो. काँग्रेसमध्ये गेले तिथे पक्षाचे नुकसान झाले. राष्ट्रवादीचेही तसेच झाले. शिवसेनेत आले तर नगरसेवक कमी झाले. ही पनवती आहे. एकनाथ शिंदे गटात आता ते गेलेत. तो गटही संपणार आहे. ते आमच्या पक्षाला लागलेले ग्रहण होते, अशी टीका भोसले यांनी बारणेंवर केली.