सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक, पुणे ते टेंभुर्णीपर्यंत पाठलाग!

| Updated on: Jan 05, 2021 | 12:28 PM

शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे हे फरार होते. त्यांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती.

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक, पुणे ते टेंभुर्णीपर्यंत पाठलाग!
Follow us on

सोलापूर : उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. राजेश काळे यांच्याविरुद्ध 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यावरुन पाठलाग करत काळे यांना टेंभूर्णी परिसरात अटक केली आहे. (Solapur Deputy Mayor Rajesh Kale finally arrested)

शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे हे फरार होते. त्यांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. आज अखेर त्यांना टेंभूर्णीजवळ अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

नियमबाह्य कामांसाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्तांना शिवीगाळ करणं, तसंच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप राजेश काळे यांच्याविरुद्ध आहेत. सोलापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इ -टॉयलेट सह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोनवरून अर्वाच्च शिवीगाळ केली. ही कामे नियमबाह्य असल्याचे सांगत यासाठी पत्र व्यवहार होणे अपेक्षित असल्याचं पांडे यांनी उपमहापौर राजेश काळे यांना सांगितल्यानंतर संतापलेल्या काळे यांनी पांडे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली.

याप्रकरणी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलिसात वारंवार खंडणी मागणे व शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कसल्याही परिस्थितीत नियमबाह्य कामे आणि कर्मचाऱ्यावर दबाव आणून कामे करून घेणे खपवून घेणार नसल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

दुसरीकडे भाजपातील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मात्र खंडणी मागितले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारी सुद्धा काळे यांनी दाखवली आहे.

राजेश काळेंच्या हकालपट्टीची मागणी

राजेश काळे यांना स्वपक्ष म्हणजे भाजपातून तसंच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजपसह विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. तर आज उपमहापौर राजेश काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

सोलापूरच्या उपमहापौरांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ?, खंडणीचा गुन्हा दाखल

सोलापूरच्या उपमहापौरांवर आधी खंडणीचा गुन्हा, आता पक्षाची शिस्तभंग नोटीस, पुढे काय होणार?

Solapur Deputy Mayor Rajesh Kale finally arrested