AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कलयुग यालाच म्हणतात, आईने आपल्या इवल्याशा बाळाला विकलं, किंमत ऐकून आणखी धक्का बसेल

Crime News : ज्या मुलाला आपल्या पोटात नऊ महिने सांभाळले, त्या मुलाची विक्री आई-वडिलांनी केली. तीन लाख रुपयांसाठी आपल्या लाडक्या मुलास दुसऱ्यांना देऊन टाकले. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली.

कलयुग यालाच म्हणतात, आईने आपल्या इवल्याशा बाळाला विकलं, किंमत ऐकून आणखी धक्का बसेल
Image Credit source: tv9
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 20, 2023 | 9:47 AM
Share

सागर सुरवसे, सोलापूर : सोलापूर शहरातून धक्कादायक बातमी आली आहे. या बातमीनंतर कलयुग यालाचा म्हणतात का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. अनेक जण आपल्याला मुल व्हावे यासाठी नवस फेडतात, वैद्यकीय उपचार करतात. परंतु दुसरीकडे स्वत:चे मुल विकणारे महाभाग अधूनमधून सापडत असतात. आता फक्त १८ दिवसांच्या बाळाची विक्री त्याच्या आई-बापानेच केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बाळ दत्तक दिल्याचा खोटा बॉण्ड त्यांनी केल्याचे उघड झाले आहे.

काय घडला प्रकार

सोलापुरात 18 दिवसांच्या नवजात बाळाच्या विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. या बालकाला 3 लाखांत विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बाळाच्या जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या बाळाची विक्री केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेने ८० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

खोटा बाँड करुन बाळाची विक्री

ज्या आईने बाळास नऊ महिने सांभाळले, तिनेच जन्माच्या अवघ्या १८ व्या दिवशी बाळ विक्री केले. त्यांनी आपले बाळ दत्तक देत असल्याचा बाँड केला. मात्र हे बाळ कोणाला देणार याचा उल्लेख बाँडमध्ये केला नाही. पोलिसांनी घटनेचा तपास करताना आईनेच आरोपीला आपले बाळ तीन लाखात विकल्याचे निष्पन्न झाले. पोटाच्या गोळाला आईनेच विकल्यामुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे.

प्रक्रिया बेकायदेशीर

बाळ दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. ज्याला मूल दत्तक घ्यायचे आहे, त्याचे पॅन कार्ड. जन्म-प्रमाणपत्र किंवा जन्म तारखेचा पुरावा असलेली कागदपत्रं. ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार नाही, याबाबतचं डॉक्टर अथवा पात्र अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र. दाम्पत्य असल्यास दोघांची स्वतंत्र प्रमाणपत्रं जमा करावी. याबाबत मोठी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया न करता दुसऱ्याच एका महिलेला बेकायदेशीर रित्या बाळ दिले. तसेच बाळ दत्तक दिल्याचा खोटा बाँड केल्याचा प्रकार उघडकीस आला. आता पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?