Solapur Suicide : सोलापूरमध्ये चिमुकल्या मुलासह आईने पेटवून घेतले, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

गौंडरे गावात मयत अंजली ही पती आणि दोन मुलांसह राहत होती. विवाहितेचा पती दत्तात्रय आंबारे हा गवंडी काम करत असल्याचे कळते. त्यांचा एक मुलगा गावात अंगणवाडीत जातो तर दुसरा त्याच्यापेक्षा लहान आहे. त्यातील एका मुलासह आईने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र अंजलीने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही.

Solapur Suicide : सोलापूरमध्ये चिमुकल्या मुलासह आईने पेटवून घेतले, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
सागर सुरवसे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 29, 2022 | 5:40 PM

सोलापूर : करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे एका विवाहितेने मुलासह पेटवून (Burn) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. अंजली दत्तात्रय आंबारे (22) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरापासून काही अंतरावर ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समजली असून नेमकी ही आत्महत्या की हत्या हे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. आत्महत्येचे कारण (Reason) अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती कळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मायलेकांचे दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

गौंडरे गावात मयत अंजली ही पती आणि दोन मुलांसह राहत होती. विवाहितेचा पती दत्तात्रय आंबारे हा गवंडी काम करत असल्याचे कळते. त्यांचा एक मुलगा गावात अंगणवाडीत जातो तर दुसरा त्याच्यापेक्षा लहान आहे. त्यातील एका मुलासह आईने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र अंजलीने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच डॉ. हिरे व कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. याचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करीत आहेत. (Suicide of a married woman with her child in Solapur for unknown reasons)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें