पुण्यात एसटीचे स्टेरिंग मॅकेनिकच्या हाती, कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांनी अडवली बस

| Updated on: Jan 08, 2022 | 11:09 PM

विलीनीकरणाच्या मागणीसाठी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप 2 महिन्यांपासून सुरूच आहे. मात्र एसटी प्रशासनानं पुण्यात चक्क एसटीच्या मॅकेनिकलाच बस चालवायला दिली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्यााचा आरोप त्यांनी केला आहे.

पुण्यात एसटीचे स्टेरिंग मॅकेनिकच्या हाती, कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, कर्मचाऱ्यांनी अडवली बस
Follow us on

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान आज एसटी आंदोलनावरून पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये चांगलाच गोंधळ पहायला मिळाला.  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच अधिकाऱ्यांनी एसटी चालू करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने कर्मचारी आक्रमक झाले, त्यांनी बस अडवत घोषणाबाजी केली.

एसटीचे स्टेअरिंग मॅकेनिकलच्या हाती

दरम्यान एसटी कर्मचारी संपावर असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आता एसटीचे स्टेअरिंग मॅकेनिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आले आहे. मात्र यावर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार अक्षेप नोंदवला आहे. मॅकेनिक कर्मचाऱ्यांच्या हाती एसटी देऊन प्रशासन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

1741 कर्मचारी बडर्तफ

विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत, कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. वारंवार इशारा देऊनही जे कर्मचारी कामावर येत नाहीत, त्यांच्यावर आता एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत एकूण 1741 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर तब्बल  11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 22 हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द

दुसरीकडे औद्योगिक न्यायालयानं, राष्ट्रवादीशी संबंधित महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द केलीय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या इंटक संघटनेनच औद्योगिक न्यायालयात धाव घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. 1996 पासून वेतन करारात योग्य वेतनवाढ न दिल्यानं, कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचं इंटकचं म्हणणं आहे. त्यांच्या वतीने याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली होती. अखेर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Pushpa The Rise | ’83’ला ओव्हरटेक करत पुष्पाच्या हिंदी वर्जनचा धुमाकूळ, तब्बल 73 कोटीची कमाई

Nashik Crime: सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न; बापानेच कृत्य केल्याचे उघड

Nashik Crime: सहा वर्षांच्या मुलीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न; बापानेच कृत्य केल्याचे उघड