Rupali Chakankar | ‘वक्तव्य मागे घ्या, महाराष्ट्राची जाहीर माफी मागा’ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतला राज्यपालांचा खरपूस समाचार

आंदोलक जबरदस्तीने आत प्रवेश करत असल्याने सुरक्षा रक्षक व आंदोलकांमध्ये प्रवेशद्वारावर बाचाबाची झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढता आपला निषेध व्यक्त केला.

Rupali Chakankar | वक्तव्य मागे घ्या, महाराष्ट्राची जाहीर माफी मागा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतला राज्यपालांचा खरपूस समाचार
Rupali Chakankar
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 3:36 PM

पुणे – चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल. गुरुचं महत्त्व खूप मोठं असतं. राज्यपालांनी(Governor) केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यभर निषेध आंदोलने केली जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्यपालांच्या वक्तव्याचा निराशेचा केल्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या(State Women’s Commission) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही ट्विट करत राज्यपाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ‘राज्यपाल कोश्यारी आपण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून सगळीकडे मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवत असताना हा महाराष्ट्र ज्यांच्या नावामुळे संपूर्ण जगभरात ओळखला जातो. त्यांच्याबद्दल बोलताना किमान अभ्यास करून बोलायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि महाबली शहाजीराजे भोसले आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले आपले वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा, जय जिजाऊ जय शिवराय. असे ट्विट केले आहे.

महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी

पुण्यातह राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलकांना महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र आंदोलक जबरदस्तीने आत प्रवेश करत असल्याने सुरक्षा रक्षक व आंदोलकांमध्ये प्रवेशद्वारावर बाचाबाची झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढता आपला निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन केलेलं वक्तव्य मागे घ्यावं.अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच भाजपची भूमिका मांडण्यापेक्षा राज्यपालांनी त्यांचं काम निःपक्षपातीपणे करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Maratha Reservation: तर ठाकरे-पवारांच्या बंगल्यात घुसू; संभाजी छत्रपतींच्या उपोषणानंतर मराठा ठोक मोर्चा आक्रमक

नाशिकमधील मार्गाला महापालिकेकडून भांतबरेकर यांचे नाव; संगीत क्षेत्रातील मानबिंदूचा अनोखा गौरव!

Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर