AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dry Day: असा कसा ड्राय डे, 40 पैकी फक्त 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारु बंदी, पुण्यातील अजब निर्णयाची सगळीकडे चर्चा

Pune Dry Day: गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी ड्राय डे पाळला जातो. पण पुण्यातील गणेशोत्सवामध्ये तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रायडे जाहीर करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काचा अजब निर्णयाची आता राज्यभर चर्चा होत आहे.

Dry Day: असा कसा ड्राय डे, 40 पैकी फक्त 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारु बंदी, पुण्यातील अजब निर्णयाची सगळीकडे चर्चा
पुणे ड्राय डेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 09, 2026 | 9:12 AM
Share

डीजे आणि साऊंड सिस्टिमच्या दणदणाटाविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवल्यानंतर पुणे पुन्हा राज्याच्या नकाशावर आले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी ड्राय डे पाळला जातो. पण पुण्यातील गणेशोत्सवामध्ये तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रायडे जाहीर करण्यात आला आहे. शहरात 40 पोलीस स्टेशन असताना तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्राय डे आदेश काढले आहेत. म्हणजे एका पावलावर मद्याचे दुकान तर दुसर्‍या पावलावर ड्राय डे अशी विचित्र परिस्थिती मद्यप्रेमींसाठी झाली आहे. आता राज्य उत्पादन शुल्काच्या अजब निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारुबंदी

पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्राय डे घोषित केला आहे. गणेश आगमन म्हणजे 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान विसर्जन मिरवणुकी पर्यंत ड्रायडे असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील इतर पोलीस स्टेशनच्या हद्द अगदी एका पावलावर बदलतात त्यामुळे इतर ठिकाणी ड्रायडे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नियमांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हसे

पुण्यातील मध्यवर्ती भागात एक गल्ली बदलली की पोलीस ठाण्याची हद्द बदलते. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना हद्दीत दारु दुकानं बंद असली तरी अवघ्या काही पावलांच्या अंतरावरील दुसर्‍या पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक्यात मद्यविक्री होणार आहे. अशा विचित्र निर्णयामुळे दारुबंदीचे, ड्रायडेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग हसे करून घेत असल्याची टीका पुणेकर करत आहेत.

पाच मिनिटांच्या अंतरावर मद्यविक्री होत असले तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाईल असाही पुणेरी टोलाही लगावला जात आहे. हा ड्राय डे आहे की मद्यप्रेमींची सोय आहे असा टोलाही पुणेकरांनी उत्पादन शुल्क विभागाला लगावला आहे. सोशल मीडियावर या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्लाही अनेक पुणेकरांनी उत्पादन शुल्क विभागाला दिला आहे.

Follow Us
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं