AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे हिंदूविरोधी, मंदिर महासंघ का झाला आक्रमक? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, प्रकरण तरी काय?

Complaint Against Tukaram Mundhe: राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. आता त्यांनी गणेशोत्सवासह सर्व धार्मिक सणातील भंडारे, महाप्रसादांकडे मोर्चा वळवला आहे. त्यावरून वाद उफळला आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे हिंदूविरोधी, मंदिर महासंघ का झाला आक्रमक? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, प्रकरण तरी काय?
तुकाराम मुंढे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 8:43 AM
Share

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. दूधपासून ते बड्या ब्रँडपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले आहे. भेसळखोरांना त्यांनी पळता भूई थोडी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दणकेबाज कारवाई सुरू असून त्याला जनप्रतिसाद मिळाला आहे. मुंढे आणि त्यांचा विभाग आक्रमक कारवायांमुळे राज्यातच नाही तर देशात चर्चेला आला आहे. आता त्यांनी गणेशोत्सवासह सर्व धार्मिक सणातील भंडारे, महाप्रसादांकडे मोर्चा वळवला आहे. त्यावरून वाद उफळला आहे.

तुकाराम मुंढे हिंदूविरोधी

भेसळखोरांविरोधात मोहिम उघडणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात कडक नियमावली जाहीर केली आहे. मंदिर, मंडळांकडून करण्यात येणाऱ्या भंडारा, अन्नदान आणि महाप्रसादाबाबत त्यांनी कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमामुळे मुंढे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मुंढे हे हिंदूविरोधी असून पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप नागपूरमधील महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी केला आहे. सेवाभावी उपक्रमांवर व्यावसायिकांप्रमाणे नियमावली लादू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी या नियमावली आणि तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनामार्फत ही तक्रार केली आहे. मुंढे हे केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांवर आणि मंदिरांमधील प्रसादावर कडक नियम लादत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मंदिरांमध्ये भक्तांच्या देणगीतून आणि सेवाभावाने महाप्रसाद शिजवला जातो. हॉटेल आणि व्यावसायिक खाद्यविक्री प्रमाणे या सेवाभावी उपक्रमांवर कोणतेही कडक निर्बंध लादू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. अन्नसुरक्षेबाबत आणि स्वच्छतेबाबत कोणताही आक्षेप नाही. पण कायदा हा सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांना समान पद्धतीने लागू करण्यात यावा. इतर धर्मीयांच्या सणांमधील सार्वजनिक अन्नवितरणाला हे नियम का लागू केले जात नाहीत, असा सवाल विश्वस्तांनी केला आहे. त्यांनी FDA हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी केली आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात