Supriya Sule : जनतेची सेवा करण्याचं सोडून सत्ता ओरबाडून घेणारं हे ईडी सरकार, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

| Updated on: Aug 24, 2022 | 11:10 AM

देशभरात महागाई हा मोठा प्रश्न आहे. मात्र भाजपाची मोठी खेळी आहे. लोकांना मूळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी काहीतरी वेगळेच मुद्दे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातत्याने लोकांना भुलवत राहायचे ही त्यांची पद्धत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Supriya Sule : जनतेची सेवा करण्याचं सोडून सत्ता ओरबाडून घेणारं हे ईडी सरकार, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : हे ईडी सरकार (ED government) आहे. साम, दाम, दंड, भेद असे काहीही करून सत्ता मिळवणारे हे सरकार आहे. 50 खोके ऑल ओकेवाले हे सरकार आहे. या सरकारची सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आलेली नाही. सत्ता ओरबाडून घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, हे दुर्दैव असल्याची खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या (Farmer’s suicide) करीत आहे. मात्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर भाजपा मूळ मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न करत असल्याचा घणाघात त्यांनी केली.

‘मूळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी वेगळेच मुद्दे काढण्याचा भाजपाचा प्रयत्न’

देशभरात महागाई हा मोठा प्रश्न आहे. मात्र भाजपाची मोठी खेळी आहे. लोकांना मूळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी काहीतरी वेगळेच मुद्दे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातत्याने लोकांना भुलवत राहायचे ही त्यांची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली. राज ठाकरे यांनी काल मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सत्ता दिल्यास सर्व टोल माफ करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका करत यामागे भाजपा असल्याचे म्हटले तसेच याचे आपल्याला काहीही आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रियाही दिली.

हे सुद्धा वाचा

‘पोलिसांकडून चांगले काम’

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे पोलिसांकडून चांगले काम होत आहे. याकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे. महिला अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. या भागातील एसपी उत्तम काम करत आहेत. भरारी पथके वाढवली आहेत. निर्भया पथकांचे काम सुरू आहे. अशावेळी आपणही जागरूक राहून सामाजिक प्रश्न म्हणून याकडे पाहिले पाहिजे आणि यावर काम केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.