
Congess-Vanchit Yuti depart: महापालिका निवडणुकीचा अभुतपूर्व गोंधळ दिसून आला. 12 हून अधिक ठिकाणी महायुती फिसकटली. भाजप आणि शिवसेना या ठिकाणी एकमेकांविरोधात लढणार आहे. तर दुसरीकडे पुण्यात काँग्रेस आणि वंचित युती तुटली आहे. पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटली आहे.पुण्यातल्या पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसची फिस्कटल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांची दिली. पुण्यात वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर लढण्याचा आदेश प्रकाश आंबेडकर यांनी दिला.जागा वाटपावरून काँग्रेस आणि वंचितची युती फिसकटली आहे. त्यातच माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी अजून एक बॉम्ब टाकला. त्यामुळे चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळे लवकराच केंद्रात मंत्री
पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटली.पुण्यातल्या पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसची फिस्कटल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.पुण्यात वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर जाण्याचा प्रकाश आंबेडकर यांनी आदेश दिला.मुंबईत आमच्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे जर कोणी नाराज असेल तर आम्हाला काही देणंघेणं नाही. आमच्यासाठी तो पक्ष महत्त्वाचा आहे,नेते नाहीत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील असे भाकीतही आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का, शरद पवार हे धक्कातंत्र वापरणार का, अशी चर्चा रंगली आहे.
शरद पवार NDA मध्ये जाणार
तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, उद्योगपती गौतम अदानी हे नुकतेच बारामतीला येऊन गेले. अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार हे लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA मध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लोकसभेत खासदारांची गरज आहे. शरद पवार यांच्याकडेही आमदार कमी आहेत. पुण्यात दोन्ही गट एकत्र आल्याने एकत्रीकरणाची पहिली पायरी गाठल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. पुण्यातील ही युती स्थानिक स्तरावरची तात्पुरती युती ठरते का याकडे सर्वांचे लक्ष आहे, राज्यातील मनपा निवडणुकीच्या धुरळ्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असे वक्तव्य केले आहे.