नवनीत राणा यांचा गेम करायचं ठरवलं असेल तर फडणवीस… सुषमा अंधारे यांचं मोठं विधान

संजय शिरसाट यांना क्लिनचीट मिळाली आहे. एखादा आरोपीच कसा सांगू शकतो की त्याला क्लीन चीट मिळालीय. महिला आयोगाकडे तो रिपोर्ट गेला नाही. याचा अर्थ आरोपी आणि तपास अधिकाराऱ्याचं संगनमत झालं आहे.

नवनीत राणा यांचा गेम करायचं ठरवलं असेल तर फडणवीस... सुषमा अंधारे यांचं मोठं विधान
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 03, 2023 | 2:27 PM

पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. त्यावर त्यांनी भाष्य केलंय. अमरावती लढण्याची चर्चा कोणी केली माहिती नाही. मी गरीब माणूस आहे. नवनीत राणांचा गेम करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असेल तर फडणवीस साहेब मला मदत करतील, असं मोठं विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे. नाही तरी राणांबद्दल भाजप नकारात्मक दिसतेय. नवनीत राणा फडणवीस यांना डोईजड झाल्या आहेत. म्हणून त्याच्या कास्ट सर्टिफिकेट इश्यू परत परत काढला जातोय. आम्ही राणांना अस्मान दाखवू. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अत्यंत ताकदीने अमरावतीत उतरेन, असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राऊत आणि मला टार्गेट केलं जातं आहे. एखादा खेळाडू चांगला खेळत असेल तर त्याची विकेट काढली जाते. पण ती विकेट जाणार नाही. खेळाडू पट्टीचा आहे. त्यामुळे त्यांना विकेट मिळणार नाही. आम्ही खंबीर आहोत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो. मात्र ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्र आपल्यावर थुकेंल त्यांना असं वाटतंय. संजय राऊत यांनी काही चुकीच केलं नाही, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.

झारीतील शुक्राचार्य शोधा

विदर्भातील भाजपच्या संघटनात्मक बांधणीतील एका महत्वाच्या पदाधिकाऱ्याने एका शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या व्यक्तीचे अत्यंत महत्वाची डाक्युमेंट दिले आहेत. व्हाटसअप चॅटसहीत पुरावे आहेत. मराठवाड्यातील एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री त्यांनी धाडस करावं मग योग्य वेळ आली की पुरावे दाखवू. एकदा नाही तर चार वेळा माझ्याकडे पुरावे दिले आहेत. भाजप आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटाला संपवू पाहत आहे. भाजपला शिंदे गटाचे ओझं कमी करायचं आहे, वाचाळवीर भरपूर झालेत. शिंदे गट नकारात्मकपणे वाढत चालला आहे. आता झारीतील शुक्राचार्य शिंदे गटाने शोधावा, असं त्या म्हणाल्या.

किशोरी पेडणेकरांबाबतची माहिती चुकीची

माजी महापौर किशोरी पेडणेकर शिंदे गटात जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. किशोरी पेडणेकरांबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली जातेय. त्या काही वैयक्तिक कारणाने समोर आल्या नसतील. कोणी सोबत आले तर कोणी नाही आले तरी आम्ही लढू, असंही त्यांनी सांगितलं.