AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोटाळे बाहेर आलेले चारही मंत्री कोणाचे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या,…

धुर्त आणि कपटी राजकारणाचं दुसरं नाव हे देवेंद्र फडणवीस आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

घोटाळे बाहेर आलेले चारही मंत्री कोणाचे, सुषमा अंधारे यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या,...
सुषमा अंधारे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 01, 2023 | 10:27 PM
Share

पुणे : महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, की नवीन वर्षात सरकार पडेल. यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, हे आम्ही चार-सहा वर्षांपासून सांगतोय की, नवीन वर्षात सरकार पडेल. खरं तर २०२४ ला निवडणुका व्हायला हव्यात. पण, शिंदे-फडणवीस सरकार २०२३ ला पडेल. त्याची अनेक लक्षणं दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना त्रास देणं सुरू केलं. भाजपच्याच तीन आमदारांनी तारांकित प्रश्न विचारून एकनाथ शिंदे यांना भूखंडप्रश्नी अडचणीत आणले. अधिवेशनात ज्या चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले ते चारही मंत्री शिंदे गटाचे आहेत. ज्या १५ जणांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीनचीट दिली ते सर्व जण भाजपचे आहेत.

भाजपच्या लोकांचे संरक्षण, शिंदे गटाच्या लोकांची गच्छंदी होत आहे. त्यात काल अब्दुल सत्तार यांचं स्टेटमेंट आलंय. धुर्त आणि कपटी राजकारणाचं दुसरं नाव हे देवेंद्र फडणवीस आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये दुर्घटना घडली. दोन जणांचे कारखान्याच्या स्फोटात गेलेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत जाहीर केली. पण, शिंदे यांच्या आपत्ती व्यवस्थापण विभागात फार काही गोष्टी दिसत नाहीत, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. महिला बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्री नसणं हे दुर्दैवी आहे.

किरीट सोमय्या हे आरंभसूर आहेत. ते चौकशी फार करतात. पण, त्याचं पुढं काय होत ते कळत नाही. राहिला प्रश्न बंगल्यांची चौकशी करायचा. तर किरीट सोमय्या यांचा टेस्ट बदलला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडं सहा बंगले एकाचवेळी कसे याच्यावर एकदा त्यांनी बोलले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Follow Us
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....