संजय शिरसाट यांच्याविरोधात घडामोडी वाढल्या, सुषमा अंधारे परळी पोलीस ठाण्यात, तर महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज परळी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. तर दुसरीकडे महिला आयोगानेही याप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

संजय शिरसाट यांच्याविरोधात घडामोडी वाढल्या, सुषमा अंधारे परळी पोलीस ठाण्यात, तर महिला आयोगाचे पोलिसांना आदेश
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 6:39 PM

पुणे : शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. याच आरोपांप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय. या प्रकरणी अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पण पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचं अंधारे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आमदार संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाने संभाजीनगर पोलिसांना पुढच्या 48 तासात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. संजय शिरसाट यांच्याविरोधात एकीकडे ठाकरे गट आक्रमक झालेला असताना आता दुसरीकडे राज्य महिला आयोगानेही कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या आगामी काळात अडचणी वाढतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे संजय शिरसाट यांच्याविरोधात पुण्यात घडामोडींना वेग आलेला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेलं. या शिष्टमंडळाने आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा

‘…तर आमदारकीचा राजीनामा देईन’

आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. “सुषमा अंधारेंचा अपमान केला. याच्यात अपमानाचं कुठे आलं तर कळलं नाही. तुमच्या चॅनलवर सुद्धा माझा व्हिडीओ फिरतोय. तो मी काढलेला नाही तर तुम्ही काढलेला आहे. त्या व्हिडीओत मी एकही अश्लिल शब्द वापरलाय असं सिद्ध करुन दाखवलं तर मी तातडीने संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाही. मी तातडीने आमदारकीचा राजीनामा देईन. मला सत्ता महत्त्वाची नाहीय. पण तुम्हाला अधिकार कुणी दिला?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“गुलाबराव पाटील यांच्याकडे जाणार त्यांना शिव्या देणार. अब्दुल सत्तार यांच्याकडे जाणार त्यांना शिव्या देणार, भुमरेंकडे जाणार आणि त्यांना शिव्या देणार. उदय सामंत, शहाजी भोसले यांना शिव्या, तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कुणी? महिला म्हणून आम्ही कुणी बोललोच नाहीत तर त्याचा तुम्ही बाहु केला आणि असं सांगितलं की सर्व महिलांवर अन्याय झाला. यांची पार्श्वभूमीवर पाहिलं तर त्या काय-काय बोलल्या याची तुमच्याकडेही रेकॉर्डिंग आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

‘आमदारकी गेली उडत’

“माझ्या इथे आजही काही निदर्शने झाली. किती महिल्या होत्या तर दहा महिला होत्या. दोन-चार माणसं होती. राजकारण समोरासमोर झालं पाहिजे. पदराआड गोळ्या झाडताय. पण हे चालणार नाही. मी तरी खपवून घेणार नाही. तुमच्या कर्त्याधर्त्यांनाही सांगून ठेवतो. संजय शिरसाट हा पोटासाठी राजकारण करणारा नाही. तुम्हाला लढायचं असेल तर समोरासमोर लढा. याद राखा माझ्या विरोधात बोलायचा प्रयत्न केला तर त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन. मागे हटणार नाही. आमदारकी उडत गेली. माझा जन्म त्यासाठी झालेला नाही”, असं शिरसाट म्हणाले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.