Pune crime : मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक करून रुग्णाच्या जीवाशी खेळ! ‘ससून’च्या अधीक्षकांचं निलंबन

पुण्यात (Pune) रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) झालेल्या किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant) फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Pune crime : मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक करून रुग्णाच्या जीवाशी खेळ! ससूनच्या अधीक्षकांचं निलंबन
रुबी हॉल क्लिनिक/ससून सर्वोपचार रुग्णालय (संग्रहित छायाचित्र)
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 10:15 AM

पुणे : पुण्यात (Pune) रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) झालेल्या किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant) फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. तावरे हे विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. तर महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली आहे. डॉ. तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. किडनी तस्करीप्रकरणी आरोग्य विभागाने सुरुवातीला रुबी हॉल क्लिनिकचा प्रत्यारोपण परवाना रद्द केला. त्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण विभागानेदेखील चौकशी समिती नियुक्त करत ही कारवाई केली.

उपाधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे तात्पुरता पदभार

तावरेंचे निलंबन केल्यानंतर अधीक्षकपदाचा तात्पुरता पदभार उपाधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. तर तावरे हे त्यांच्या मूळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत राहतील.

काय आहे वाद?

कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले. संबंधित महिलेने आणि एजंटांनी बनवून दिलेली खोटी कागदपत्रे याची सत्यता पडताळणी डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला.

आणखी वाचा :

Aurangabad | मैत्रीणीच्या नावाने इंस्टा अकाउंट, मित्र-मैत्रीणींशी चॅटिंग, औरंगाबाद पोलिसांनी उघडा पाडला बनाव!

Aurangabad VIDEO | ओट्यावर बसून घराकडे का पाहतोस? टोळक्याची मारहाण, औरंगाबादेत तरुणाचा मृत्यू

Video : धक्कादायक ! ठाण्यात सोसायटीच्या आवारात खेळत असल्याच्या रागातून वकिलाकडून मुलाला मारहाण