Video : धक्कादायक ! ठाण्यात सोसायटीच्या आवारात खेळत असल्याच्या रागातून वकिलाकडून मुलाला मारहाण

ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या चंदनवाडी परिसरात असणाऱ्या सरोवर दर्शन टॉवरमध्ये 10 वर्षीय मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. सोसायटीच्या आवारात का खेळतो हा राग मनात धरुन याच सोसायटीत राहणाऱ्या आणि व्यवसायाने वकिल असणाऱ्या चेतन पाटीलने दारूच्या नशेत मुलाला सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेऊन बेदम मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Video : धक्कादायक ! ठाण्यात सोसायटीच्या आवारात खेळत असल्याच्या रागातून वकिलाकडून मुलाला मारहाण
ठाण्यात वकिलाकडून मुलाला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 12:22 AM

ठाणे : सोसायटीच्या आवारात खेळत असल्याच्या रागातून व्यवसायाने वकील असलेल्या व्यक्तीने एका 10 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना ठाण्यातील नौपाडा भागातील चंदनवाडी परिसरात घडली आहे. चंदनवाडी परिसरातील सरोवर दर्शन टॉवरमध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत पीडित मुलाच्या कानाला दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाला आहे. चेतन पाटील असे मारहाण करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. (A boy was beaten by a lawyer out of anger while playing in the premises of the society in Thane)

दारुच्या नशेत आरोपीकडून मुलाला मारहाण आणि शिवीगाळ

ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या चंदनवाडी परिसरात असणाऱ्या सरोवर दर्शन टॉवरमध्ये 10 वर्षीय मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. सोसायटीच्या आवारात का खेळतो हा राग मनात धरुन याच सोसायटीत राहणाऱ्या आणि व्यवसायाने वकिल असणाऱ्या चेतन पाटीलने दारूच्या नशेत मुलाला सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेऊन बेदम मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मारहाणीत मुलाच्या कानाला आणि शरीराला दुखापत झाली असून त्याच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपी स्वतःच्या आई-वडिलांनाही मारहाण करीत असल्याची माहिती

मुलाच्या आजोबांनी हा सर्व प्रकार सोसायटीच्या सदस्यांना सांगितल्यानंतर सर्व सदस्य आरोपी चेतन पाटील याच्या घरी गेले असता चेतन दारूच्या नशेत तो आपल्या आई वडिलांना देखील मारत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याने मुलाचे आजोबा डॉ. अजित गोरे आणि सोसायटीच्या सदस्यांनी आरोपी चेतन पाटील विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. मात्र पोलिसांनी आरोपी चेतन पाटील याला अद्यापही ताब्यात घेतले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. तर आरोपी चेतन पाटील याला पोलिसांनी त्वरित अटक करावी आणि त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुलाचे आजोबा डॉ. अजित गोरे यांनी केली आहे. (A boy was beaten by a lawyer out of anger while playing in the premises of the society in Thane)

इतर बातम्या

Gondia : यादीत नाव येऊनही कर्ज माफी न झाल्याने गोंदियातील शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर

Video : उल्हासनगरमध्ये मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या, तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.