Baramati| बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांच्या निधनाने त्यांच्या घरावर मोठे संकट

| Updated on: Feb 20, 2022 | 4:47 PM

सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांना लहानपणापासूनच देशाचे संरक्षण करण्याचा मानस होता ते लहान असल्यापासूनच आपल्या आई-वडिलांना त्यांची इच्छा व्यक्त करीत होते.  त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या ट्रेनिंग साठी जाण्यासाठी त्यांना भरपूर अडचणी येत असल्याचे त्यांचे वडील बापुराव इंगवले यांनी सांगितले आहे. अशोक इंगवले हे मागील आठ वर्षापासून सीआरपीएफ मध्ये सेवा बजावत होते.

Baramati| बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांच्या निधनाने त्यांच्या घरावर मोठे संकट
Ashok ingawale
Follow us on

पुणे- जिल्ह्यातील बारामती(Baramati)  तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र सीआरपीएफ जवान (CRPF Jawan) अशोक बापूराव इंगवले (Ashok Bapurao Ingawale)यांना देशसेवा बजावत असताना पंजाब येथे मंगळवारी (15 फेब्रुवारी) वीरमरण आले. पार्थिवावर 16 फेब्रुवारी रोजी कऱ्हा निरा नदीच्या पवित्र संगमावरील सोनगाव या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांना लहानपणापासूनच देशाचे संरक्षण करण्याचा मानस होता ते लहान असल्यापासूनच आपल्या आई-वडिलांना त्यांची इच्छा व्यक्त करीत होते.  त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या ट्रेनिंग साठी जाण्यासाठी त्यांना भरपूर अडचणी येत असल्याचे त्यांचे वडील बापुराव इंगवले यांनी सांगितले आहे. अशोक इंगवले हे मागील आठ वर्षापासून सीआरपीएफ मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते रांची या ठिकाणी कार्यरत होते, पंजाबमध्ये बंदोबस्तावर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. त्यांच्या मागे पत्नी, आई ,वडिल, दोन वर्षांचा मुलगा, दोन महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.

खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली होती श्रद्धांजली..

“बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र बीएसएफ जवान अशोक बाबुराव इंगवले यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. देशाच्या सेवेत त्यांनी केलेल्या या सर्वोच्च त्यागास सलाम. इंगवले परीवारावर कोसळलेल्या या कठिण प्रसंगात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.” अशी सुप्रिया सुळे यांनी 15 फेब्रुवारी ला फेसबुक वर श्रद्धांजली वाहिली होती.

ती भेट आजही स्मरणात आहे

“पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! तीन वर्षांपूर्वी 17 फेब्रुवारी 2019 ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्यानं पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचं समजून धक्का बसला व अतीव दुःख झाले. त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. महाराष्ट्राच्या मातीला शौर्याची, धैर्याची, पराक्रमाची, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. देशसेवेची ही परंपरा कायम राखत वीर जवान अशोक इंगवले यांनी देशाची एकता, अखंडता व लोकशाहीचे रक्षण करत असताना प्राणार्पण केले. देशाची सेवा बजावताना त्यांनी केलेल्या त्यागास, बारामतीच्या वीर सुपुत्रास सलाम!” अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या फेसबुक वर श्रद्धांजली वाहिली होती.

Tug of war | रस्सीखेच स्पर्धेत भाग घेऊन महापौर Kishori Pednekar यांनी दिला उपस्थितांना धक्का

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; सहा दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

घरातील कामं केल्याने कोरड्या झालेल्या हाताना बनवा कोमल – मुलायम , फॉलो करा या काही टीप्स!