Baramati accident death| बारामतीतील सराफा व्यवसायिकाच्या कुटुंबावर काळाचा घाला ; उसाने भरलेल्या ट्रॉलीला कारची भीषण धडक, एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

Baramati accident death| बारामतीतील सराफा व्यवसायिकाच्या कुटुंबावर काळाचा घाला ; उसाने भरलेल्या ट्रॉलीला कारची भीषण धडक, एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू
सांकेतिक फोटो

तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने मागून गाडी धडली. त्याने हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 19, 2022 | 1:09 PM

पुणे- उसाच्या ट्रॉलीला भरधाव कराची धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बारामतील प्रसिद्ध सराफा व्यापारी व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. बारामती-मोरगाव रस्त्यावर तरडोलीनजिक हा अपघात झाला आहे.

या अपघातात अश्विनी श्रेणिक भंडारी (वय 48), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय 24), कविता उदय शहा (वय 62 रा. सर्व सुभाष चौक बारामती) बिंदिया सुनील भंडारी या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यांना पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना

भंडारी कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्याला गेले आहे. कार्यक्रम संपवून बारामतीला निघालेले असताना तरडोलीपासून पुढे आल्यानंतर उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने भंडारी कुटुंबियाच्या कारने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्याने हा अपघात झाला. गाडीची धडक जोरदार होती. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला यात गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताने भंडारी व कळसकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. बारामती परिसरात धार्मिक कुटुंब म्हणून त्यांची ओळख होती. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  श्रमिक भंडारी हे बारामतीतले सराफ व्यावसायिक आहेत. हे कुटुंबीय अत्यंत मनमिळावू आणि धार्मिक स्वभावाचे आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्ये शोककळा पसरली आहे.

Karjat Nagar Panchayat Election 2022 | कर्जतमध्ये रोहित पवारांची जादू, राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

Nashik Corona | 304 कोरोना मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी 50 हजार जमा; पण वाढत्या अर्जांनी वाढवली भीती

Nagar Panchayat Election result 2022: मतदारांनी दिलं, ईश्वर चिठ्ठीने हिरावून नेलं; वाचा, कोणत्या उमेदवारांचं ईश्वर चिठ्ठीने भाग्य फळफळलं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें