Nashik Corona | 304 कोरोना मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी 50 हजार जमा; पण वाढत्या अर्जांनी वाढवली भीती

नाशिक जिल्ह्यात एकूण 8 हजार 772 कोरोना मृतांची नोंद आहे. मात्र, तब्बल 12 हजार 765 वारसांना या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केल्याचे समजते.

Nashik Corona | 304 कोरोना मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी 50 हजार जमा; पण वाढत्या अर्जांनी वाढवली भीती
Nashik Municipal Corporation
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 12:10 PM

नाशिकः कोरोना (Corona )मृताच्या वारसांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू झाले असून, नाशिक जिल्ह्यात 304 मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येक 50 हजार रुपये जमा झाले आहेत. येणाऱ्या काळात ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यातही ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते. जिल्ह्यात एकूण 8 हजार 772 कोरोना मृतांची नोंद आहे. मात्र, तब्बल 12 हजार 765 वारसांना या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केल्याचे समजते. त्यात अनेकांनी दोन-दोनदा अर्ज केलेत. तर अनेक मृत्यूची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे या वाढत्या अर्जांनी कोरोना बळीचा आकडाही नंतर वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे बंधन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने अर्ज मागवण्यात आले होते. एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने मृत झाला असेल, तर त्याच्या नावावरचे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून एकपेक्षा जास्तही अर्ज येऊ शकतात. हे लक्षात घेता अनुदान मिळवण्यासाठी आता वारसांना तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

समितीची करडी नजर

विशेष म्हणजे मृत कोविड रुग्णांच्या वारसांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत एका समितीची स्थापना केली. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी आहेत. ही समिती मदत देण्याबाबतच्या साऱ्या प्रकरणांवर करडी नजर ठेवत आहे. त्यानंतरही जिल्ह्यात शासनदरबारी नोंद असलेल्या एकूण बळींच्या आकडेवारीच्या जवळपास चार हजार अर्ज जास्त आले आहेत. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. यातील काही अर्ज दोनदा आणि काही बोगस गृहित धरले तरी बळींचा आकडा नक्कीच वाढू शकतो.

कसून तपासणी

कोरोना बळींचा आकडा सानुग्रह अनुदानाच्या अर्जामुळे वाढल्याने प्रशासनही हादरले आहे. ही खरोखरीची आकडेवारी आहे की, अनेकांनी सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी खटाटोप केली, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय हे अनुदान मिळवून देण्यासाठी अनेक एजंट ही सक्रिय झाले होते. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कसून तपासणी सुरू केल्याचे समजते. मात्र, महापालिकेच्या वतीने कोरोना मृत्यूंचे कोणतेही आकडे लपवले नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.

इतर बातम्याः

Nagar Panchayat Election result 2022 : निफाडमध्ये शिवसेना; सुरगाणा, देवळा नगरपंचायती भाजपकडे

Nagar Panchayat Election result 2022: केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांना धक्का; दिंडोरीत शिवसेना नंबर एक…!

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.