Pimpri-chinchwad crime| पिंपरीत खासगी सावकाराचा प्रताप 60 टक्के व्याजदराने आकार होता व्याज

या दोघांनीही कर्जदारांकडून अतिरिक्त पैश्याची मागणी करत त्याला धमकी दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी विशाल कैलास बर्डे (वय 35, खेड) याने तक्रार दिली आहे. संबधित प्रकार 20 ते 23 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आळंदी येथे घडला आहे.

Pimpri-chinchwad crime| पिंपरीत खासगी सावकाराचा प्रताप 60 टक्के व्याजदराने आकार होता व्याज
Privet lender
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 12, 2022 | 3:23 PM

पिंपरी – शहरात गुन्ह्यांची संख्या वाढत असताना , शहरात खासगी सावकारकीचा (Private lender)धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या खासगी सावकारांने तब्बल 60.50 व्याज दर आकारत कर्ज पुरवठा केल्याचे समोर आले आहे. पिपंरी पोलिसांनी (Pimpri-chinchwad Police) याप्रकरणी दोन खासगी व्याज घेतले या गुन्ह्यांमधील सावकारांवर पोलिसांनी गुन्हा(crime) दाखल केला आहे. हिरामण भिकू चौधरी, वैभव दिगंबर चौधरी (ता.खेड) कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनीही कर्जदारांकडून अतिरिक्त पैश्याची मागणी करत त्याला धमकी दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी विशाल कैलास बर्डे (वय 35, खेड) याने तक्रार दिली आहे. संबधित प्रकार 20 ते 23 नोव्हेंबर 2020 या कालावधीत आळंदी येथे घडला आहे.

तर झालं असं की..

फिर्यादी विशाल बर्डे याने खासगी सावकार हिरामण भिकू चौधरी, वैभव दिगंबर चौधरी या दोघांकडून सात लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.  त्या कर्जाची व्याजासहित परॅट फेड करण्यात आली. मात्र आरोपी सावकारांनी अद्यापही तू पैश्याचे देणं लागतो. ते व्याजाचे पैसे तुलना द्यावे लागतील . अन्यथा ते तुला महागात पडले. त्यामुळे तीन लाख 30 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर फितर्यादीने दिलेले चेक बाऊंस करत त्यांना वकिलाच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली. पैश्यासाठी सातत्याने धमक्या देता छळ केल्याची माहितीही फिर्यादीने पोलिसात दिली आहे.

पोलिसांचा मोठा निर्णय, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आता पोलीस ठाण्यात यायची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्त म्हणतात रिपोर्ट करा

Nagpur | कौटुंबिक समुपदेशन का गरजेचे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी सांगितले कारण

कोण आहे तेजस मोरे, ज्याच्यावरय प्रवीण चव्हाणांचं स्टिंग करून फडणवीसांना दारुगोळा पुरवल्याचा आरोप!