कोण आहे तेजस मोरे, ज्याच्यावरय प्रवीण चव्हाणांचं स्टिंग करून फडणवीसांना दारुगोळा पुरवल्याचा आरोप!

विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी विशेष सरकारी वकिलांच्या घरात केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा बॉम्बगोळा टाकला अन् सारेच हादरून गेले. आता या साऱ्या स्टिंग ऑपरेशनमागे जळगावचा तेजस मोरे याचा हात असल्याचा आरोप होतोय. कोण आहे हा तेजस मोरे, जाणून घेऊयात.

कोण आहे तेजस मोरे, ज्याच्यावरय प्रवीण चव्हाणांचं स्टिंग करून फडणवीसांना दारुगोळा पुरवल्याचा आरोप!
तेजस मोरेचे जळगाव येथील घर.
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 2:47 PM

जळगावः विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी विशेष सरकारी वकिलांच्या घरात केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा बॉम्बगोळा टाकला अन् सारेच हादरून गेले. आता या साऱ्या स्टिंग ऑपरेशनमागे जळगावचा तेजस मोरे याचा हात असल्याचा आरोप होतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्यावर गंभीर आरोप केला. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. त्यात विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण सहभागी असल्याचा दावा करत अनेक व्हिडिओ असलेला एक पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिला. अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडिओमधील संवादही फडणवीसांनी वाचून दाखवला. महाविकास आघाडी सरकारला घाम फोडायला लावणारे हे स्टिंग ऑपरेशन करण्यामागे जळगावचा तेजस मोरे असल्याचा आरोप होतोय. जाणून घेऊयात हा तेजस मोरे कोण आहे?

कोण आहे तेजस मोरे?

जळगावमधील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयास स्टिंग ऑपरेशन केल्याचा तेजस मोरेवर आरोप आहे. तेजस मोरे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचे जळगामधील घरी असलेले येणे-जाणे बंद असल्याचे समजते. तेजसवर जळगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. तेजसच्या वडिलांनी जळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते येथेच सेवानिवृत्त झाले.

पुण्याला बिल्डर म्हणून काम…

तेजसने सुरुवातीला जळगावमध्ये बांधकाम व्यवसाय सुरू केला. मात्र, तो इथे रमला नाही. दोन वर्षांनी तो पुण्यात गेला. तिथे बिल्डर म्हणून काम करतो, अशी माहिती मिळाल्याचे तेजसच्या शेजाऱ्यांनी सांगितले. खूप कमी काळात तो मोठा झाला. त्याच्याकडे मध्यंतरी पोलीस यायचे. मात्र, तेजसच्या घरी राहुल जैन नावाचा मुलगा होता. तो त्यांना तेजस इथे रहात नाही असे सांगायचा. पोलीस यायचे आणि निघून जायचे.

भोसले बिल्डरशी संबंध…

तेजस मोरे याचे नाव मध्यंतरी पुण्यातील एका भोसले बिल्डरच्या घोटाळ्यातही आले होते, अशी माहिती मिळाल्याचेही त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. तर एका महिला शेजाऱ्याने तो लहानपणी आमच्या घरी यायचा. स्वभावाने चांगला होता. मुलांसोबत खेळायचा आता पुढची त्याची काही माहिती नसल्याचे सांगितले. काहीही असो सध्या फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्बगोळ्यामुळे तेजस मोरेची जोरदार चर्चा सुरूय हे मात्र तितकेच खरे.

इतर बातम्याः

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना नोटीस; चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

आणि तरीही मी पोलीसांसमोर हजर होणार, फडणवीसांची घोषणा, मुंबईकरांचा रविवार उद्या राजकीयदृष्ट्या टाईट जाणार

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...