AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराच्या चर्चांना पुन्हा जोर, आगामी महापालिका निवडणुकीत काय गणितं बदलणार?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (Nitin Landge) यांच्यावर 9 लाखाच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) कारवाई करत अटक केली आहे. या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या अग्रभागी आला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराच्या चर्चांना पुन्हा जोर, आगामी महापालिका निवडणुकीत काय गणितं बदलणार?
पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका
| Edited By: Ajinkya Guthe | Updated on: Aug 20, 2021 | 4:05 PM
Share

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (Nitin Landge) यांच्यावर 9 लाखाच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) कारवाई करत अटक केली आहे. लांडगे यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. या अटकेनंतर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नितीन लांडगे यांना राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय असं भाजपकडून सांगण्यात येत आहे तर विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. पण या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या अग्रभागी आला आहे. (The issue of corruption is most discussed in Pune and Pimpri Chinchwad Municipal Corporations)

भाजपची सत्ता आल्यापासून ९ प्रकरणांमध्ये रंगेहाथ पकडलं

पिंपरी चिंचवडमध्ये लाचखोरीच्या या घटनेनंतर सत्ताधारी भाजपाची राजवट आणि महापालिकेचा कारभार चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या १५ वर्षात महापालिकेत लाच प्रकरणाची २७ प्रकरणे उघडकीस आली आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत नऊ प्रकरणांमध्ये बारा जणांना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. महापालिकेत कसलंही काम असो, कोणत्याही फाईलवर सही करायची असो, त्यासाठी फाईलचं ‘वजन’ वाढवावंच लागतं, असा अलिखित नियमच झाल्याचं अनेकजण सांगतात.

२०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे तत्कालिन आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वीय सहाय्यकाला १२ लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर महापालिकेचे मुख्याध्यापक, सहाय्यक आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. पालिकेतल्या आरोग्य, शिक्षण, लेखा, नगरसचिव विभागातल्या कर्मचाऱ्यांचा लाचखोरीत प्रमुख्याने समावेश आहे.

पुणे महापालिकेतल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सापळा रचून कारवाई

दुसरीकडे पुणे महापालिका प्रशासनातही लाचखोरीच्या अनेक घटना मागच्या काही वर्षांत उघडकीस आल्या आहेत. पुणे महापालिका प्रशासनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर अनेकदा सापळा लावून कारवाई करण्यात आली आहे. यावर्षी मे महिन्याच्या मध्यापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पकडण्यासाठी एकूण २८१ सापळे रचले. त्यात काही खासगी व्यक्ती, दलालांसह ३८१ जणांना सुमारे ७० लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं आहे. यामध्ये महसूल आणि पोलीस विभागातल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी ५८ कारवाया झाल्या आहेत.

आगामी निवडणुकीत गाजणार भ्रष्टाचाराचा मुद्दा

२०२२ मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावाचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे सांगता येत नसलं तरी, राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात हा भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आल्यानं विरोधकांना आयतं कोलित मिळालं आहे. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपनं महापालिकेत सत्ता मिळवली मात्र, आता थेट स्थायी समिती अध्यक्ष लाच प्रकरणात कोठडीत गेल्याने हा मुद्दा येत्या निवडणुकीत गाजणार यात शंका नाही.

संबंधित बातम्या :

राज्यपाल म्हणाले, 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा आग्रह नाही; अजितदादा म्हणतात, मुख्यमंत्री आणि मी त्यांना पुन्हा भेटणार

पुण्याच्या पाणी कोट्यात वाढ, 23 समाविष्ठ गावांचा 1.75 टीएमसी कोटा महापालिकेकडे वर्ग

पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?