पुण्याच्या पाणी कोट्यात वाढ, 23 समाविष्ठ गावांचा 1.75 टीएमसी कोटा महापालिकेकडे वर्ग

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 गावे समाविष्ठ करण्यात आली आहेत. त्यानंतर या गावांना जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) वर्षाला देण्यात येणारा 1.75 टीएमसी पाणीसाठा पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पुण्याला दरवर्षी मिळणाऱ्या पाणी कोट्यात वाढ झाली आहे.

पुण्याच्या पाणी कोट्यात वाढ, 23 समाविष्ठ गावांचा 1.75 टीएमसी कोटा महापालिकेकडे वर्ग
पुण्याचा पाणीकोटा वाढला
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 2:22 PM

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 गावे समाविष्ठ करण्यात आली आहेत. त्यानंतर या गावांना जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) वर्षाला देण्यात येणारा 1.75 टीएमसी पाणीसाठा पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे पुण्याला दरवर्षी मिळणाऱ्या पाणी कोट्यात वाढ झाली आहे. (1.75 TMC water supply of 23 villages has been given to Pune Municipal Corporation)

23 गावांना आता महानगरपालिका पाणीपुरवठा करणार

जलसंपदा विभागाकडून मोठ्या वसाहती, उद्योग आणि ग्रामपंचायतींना मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पुणे महानगरपालिकेत नव्याने 23 गावं समाविष्ठ करण्यात आली आहेत. या गावांमध्ये 13 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना दरवर्षी 1.75 टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून पुरवलं जातं. आता महानगरपालिकेकडून या गावांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याने हे पाणी महानगरपालिकेच्या कोट्यात वर्ग करण्यात आलं आहे.

पुण्याचा पाणीकोटा गेला 13.25 टीएमसीवर

पाणी कोटा निर्धारित करण्याचे मापदंड ठरवण्यात आले आहेत. यानुसार 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये दरडोई 135 लीटर पाणी दिलं जातं. पुण्याची लोकसंख्या 40 लाख असताना पुण्यासाठी वर्षाला 8.16 टीएमसी पाणी देण्याचे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला होता. त्यामध्ये राज्य सरकारने वाढ करत मार्च 2013 मध्ये पुण्याचा पाणीकोटा वाढवून 11.50 टीएमसी केला होता. आता 23 गावांचा 1.75 टीएमसी पाणीकोटाही महापालिकेकडे वर्ग होत असल्याने पुण्याचा पाणीकोटा 13.25 टीएमसीवर गेला आहे.

पुणे शहराची लोकसंख्या 59 लाख 16 हजार

महानगरपालिकेला दरवर्षी जुलै महिन्यात शहराच्या लोकसंख्येनुसार पाण्याचे वार्षिक अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे सादर करावं लागतं. गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकानुसार पुणे शहराची लोकसंख्या 59 लाख 16 हजार दाखवण्यात आली. कोरोनाकाळात पुण्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. त्यामुळे यावर्षीची लोकसंख्या 53 लाख 12 हजार दाखवण्यात आली आहे. यामध्ये फ्लोटिंग असलेली लोकसंख्या जवळपास 3 लाखांच्या घरात आहे.

संबंधित बातम्या :

Pune Metro | मेट्रोच्या प्राधान्य मार्गांचं काम पूर्ण, फुगेवाडीत उभारली ऑपरेशनल कंट्रोल रुम, वर्षाअखेरीस प्रवासी सेवा सुरू होणार

कोरोनामुळे पुणे विद्यापीठाचा शुल्क कपातीचा निर्णय! उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नावात बरंच काही आहे! सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर ते बटाट्या मारूती, पुणेकरांनी देवांना अशी नावं का दिली हे माहितीय का?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.