Pune Metro | मेट्रोच्या प्राधान्य मार्गांचं काम पूर्ण, फुगेवाडीत उभारली ऑपरेशनल कंट्रोल रुम, वर्षाअखेरीस प्रवासी सेवा सुरू होणार

पुणेकरांचं मेट्रोतून (Pune Metro) प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोने (Maha Metro) पहिल्या टप्प्यातल्या कामाला वेग पकडला आहे. ट्रायल रन (Metro Trail Run) यशस्वी झाल्यानंतर आता मेट्रोच्या प्रवासी सेवेलाही लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे.

Pune Metro | मेट्रोच्या प्राधान्य मार्गांचं काम पूर्ण, फुगेवाडीत उभारली ऑपरेशनल कंट्रोल रुम, वर्षाअखेरीस प्रवासी सेवा सुरू होणार
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 12:10 PM

पुणे : पुणेकरांचं मेट्रोतून (Pune Metro) प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोने (Maha Metro) पहिल्या टप्प्यातल्या कामाला वेग पकडला आहे. ट्रायल रन (Metro Trail Run) यशस्वी झाल्यानंतर आता मेट्रोच्या प्रवासी सेवेलाही लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे. महामेट्रोकडून आता पुण्यातल्या मेट्रोसाठीचं ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (Operation Control Centre) कार्यन्वित करण्यात आलं आहे. फुगेवाडी इथं हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. या सेंटरच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) ते फुगेवाडी (Fugewadi) आणि वनाज (Vanaj) ते गरवारे कॉलेज (Garware Collage) या दोन मार्गांवर मेट्रोचं संचलन आणि नियंत्रण केलं जाणार आहे. (An operational control centre has been set up at Fugewadi for the Pune Metro)

तात्पुरत्या स्वरूपात फुगेवाडीत कंट्रोल सेंटर

मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑपरेशनल कंट्रोल रुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मेट्रोच्या नियोजनानुसार रेंजहिल्य इथल्या डेपोच्या जागेत ही ऑपरेशनल कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे. यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. मात्र, प्राधान्य मार्गावरच्या सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात फुगेवाडी स्टेशन परिसरात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.

अडचणीच्या काळात प्रवाशांना साधता येणार थेट संपर्क

फुगेवाडी इथल्या ऑपरेशनल कंट्रोल रूममध्ये मेट्रोच्या संचलनासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक मेट्रो स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरही या सेंटमधून लक्ष ठेवलं जात आहे. प्रवास करताना नागरिकांनी कसलीही समस्या उद्भवल्यास त्यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आणि प्रवाशांनी पॅनिक बटण दाबल्यास थेट या ऑपरेशल कंट्रोलरूमशी नागरिकांनी संपर्क साधता येणार आहे.

या ऑपरेशनल कंट्रोल रूमच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकांचं संपूर्ण ट्रॅकिंग ठेवलं जाणार आहे. सोबतच मेट्रो मार्गांच्या सिग्नलवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. दोन मेट्रोमध्ये समन्वय राखण्याचं काम कंट्रोल रुमच्या माध्यमातून केलं जाईल. शिवाय आपत्कालिन स्थितीत कंट्रोल रुममधूनच परिस्थिती हाताळली जाईल.

यावर्षाच्या अखेरपर्यंत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा

पुणे मेट्रोच्या दोन्ही प्राधान्य मार्गांची कामं पूर्ण झाली आहेत. या मार्गांवरच्या स्थानकांची कामंही प्रगतीपथावर आहेत. पुढच्या काही दिवसांत प्रवासी सेवा सुरू करता यावी यासाठी मेट्रोकडून इतर तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. या सर्व बाबी पूर्ण झाल्या तर या वर्षाच्या अखेरपर्यंत पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही : अजित पवार

दाभोलकरांच्या हत्येला 8 वर्षे, मात्र मुख्य सूत्रधारांना शोधण्यात अपयश, अंनिसकडून ठिकठिकाणी निदर्शनं

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...