पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी सकाळी पुण्यात शाब्दिक फटकेबाजी केली. पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, अशा देवांची नावे सांगितली. अगदी सातच्या कार्यक्रमाला अजित पवार दहा मिनिटे अगोदर उपस्थित राहिले. त्यावरही त्यांनी टोला लगावत ‘जे सूर्यमुखी असतील ते मला शिव्या देत असतील’, असं म्हटलं. तर मला सकाळी सकाळी कार्यक्रम घ्यायला आवडतो, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.