Marathi News » Maharashtra » Other district » Full security of police on the main ground, supporters built another ground at night, Gopichand Padalkar supporter orgnized Bullock cart race in Maharashtra sangali zare
मुख्य मैदानावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रातोरात समर्थकांनी दुसरं मैदान बनवलं, गोपीचंद पडळकरांचा ‘गनिमी कावा’ यशस्वी!
कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले.
पोलिस आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवत पडळकर आणि समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे...
Follow us
सांगली : गेल्या तीन ते चार दिवसांपासून झरे गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. झरे गावच्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही मागे पोलिस असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. बैलगाडा शर्यत होणारच असं म्हणत पडळकरांनी पोलिस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अखेर शासन प्रशासनाला गुंगारा देत पडळकरांचा गनिमी कावा यशस्वी झाला आहे.