मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत ‘लव्ह जिहाद’, पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!

भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली. परंतु या दरम्यान आपण खरंच पुरोगामित्वाची कास धरली आहे का? असा सवाल विचारण्याचे कारण म्हणजे पुणे आणि नाशिकची घटना... (Threats to inter religion couple saying love jihad in Pune)

मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत 'लव्ह जिहाद', पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!
पुण्यात आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या जोडप्याला लव्ह जिहाद म्हणत धमक्या

पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे पूर्ण झाली. परंतु या दरम्यान आपण खरंच पुरोगामित्वाची कास धरली आहे का? असा सवाल विचारण्याचे कारण म्हणजे पुणे आणि नाशिकची घटना… लग्न करणारी जोडपी आंतरधर्मीय आहेत, म्हणून जोडप्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आणि हे प्रकार कुठे होतायत तर पुरोगामी महामानवांचा वारसा असलेल्या पुणे आणि नाशिकमध्ये… (Threats to inter religion couple saying love jihad in Pune)

पुण्याची नेमकी घटना काय?

पुण्यातील एका होऊ घातल्या लग्नामुळे वादंग निर्माण झाला आहे. लग्न करणाऱ्या मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणीला धमक्या येऊ लागलेल्या आहेत. या जोडप्याने पुण्यातल्या विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज केला होता. तिथल्या नोटीस बोर्डावरचा अर्ज नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सोशल मीडियावरुन तरुण आणि तरुणीला धमक्या येऊ लागल्या.

विवाह नोंदणी कार्यालयातून ही नोटीस (अर्ज) नेमकी कुणी आणि का म्हणून व्हायरल केली?, असा सवाल उपस्थित होतोय. हे लग्न म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा आरोप करत जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देण्यात येत आहेत. सततच्या धमक्यांमुळे हे जोडपं दहशतीत आहे.

मुलीच्या आणि मुलाच्या घरच्यांचा लग्नाला पाठिंबा, मग बाहेरच्यांचा का विरोध?

पुण्यातल्या या जोडप्याच्या लग्नाला विशेष म्हणजे या मुलीच्या आणि मुलाच्या घरच्यांची परवानगी आहे. मुलाच्या आणि मुलीच्या घरच्यांची परवानगी असताना विरोध करणारे तुम्ही कोण? असा सवाल आता सुजान नागरिक हिंदुत्ववाद्यांना विचारात आहेत.

राईट टू लव्ह संस्थेचे पदाधिकारी गृहमंत्र्यांची भेट घेणार

पुण्यातील राईट टू लव्ह ही संस्था या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यांना भेटून हा सगळा सविस्तर विषय त्यांच्या कानावर टाकणार आहे, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी विकास शिंदे यांनी दिलीय. तसंच तरुण-तरुणींनी अजिबात घाबरुन जावू नये, धमक्यांना भीक घालू नये, राईट टू लव्ह ही संस्था अशा जोडप्यांमागे खंबीरपणे उभी आहे, असंही महेश शिंदे म्हणाले.

नाशिकमधली घटना काय?

नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आलेला आहे… नाशिकमध्ये हिंदु तरुणी मुस्लिम तरुणाचा विवाह हा 18 जुलैला होणार होता. त्यासाठी दोन्ही कुटुंबियांकडून सगळी तयारी देखील पूर्ण झालेली होती. एका चांगल्या हॉटेलमध्ये लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र लग्न पत्रिका व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या घरच्यांना काही लोकांनी विरोध केला. तेव्हापासून त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले. सततच्या धमक्यांमुळे लग्न रद्द करण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांवर दबाव वाढू लागला. जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे कुटुंबियांवर लग्न रद्द करण्याची वेळ आलीय. मुलगा मुस्लिम असल्याने या लग्नाला काही जणांकडून विरोध करण्यात येतोय.

आंतरधर्मीय लग्नांना विरोध करणारे हे नेमके संस्कृतीचे ठेकेदार कोण?

या आंतरधर्मीय लग्नांना विरोध करणारे हे नेमके संस्कृतीचे ठेकेदार कोण आहेत? त्यांना कायद्याची भिती नाही का? संविधान मान्य नाही का? निवडणुकीवेळी फुले-शाहू आंबेडकरांच्या नावाचं जप करणारे पक्ष आणि सध्याचं सरकार यावर काही पावले उचलणार आहे की नाही?, असे सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

(Threats to inter religion couple saying love jihad in Pune)

Published On - 1:15 pm, Sun, 11 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI