AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवना धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला; 71 टक्के पाणीसाठा जमा

Pawna Dam | जून महिन्यातील उत्तरार्ध आणि जुलैच्या पूर्वाधात दडी मारलेल्या पावसाने राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत यावर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस (Rain) पडला आहे.

पवना धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला; 71 टक्के पाणीसाठा जमा
पवना धरण
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 24, 2021 | 12:32 PM
Share

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली. सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसात 579 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली आहे.

जून महिन्यातील उत्तरार्ध आणि जुलैच्या पूर्वाधात दडी मारलेल्या पावसाने राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत यावर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस (Rain) पडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.

राज्यात ताम्हिणी घाटासह 13 ठिकाणी ढगफुटी

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात जवळपास 13 ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ग्रामीण भागात रडारयंत्रणा नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही. परंतु, संबंधित परिसरातील पावसाचे (Rain) एकूण स्वरुप पाहता राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा हवामान आयआयटीएमचे हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

ताम्हिणी घाटात 468 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिपळूण आणि महाबळेश्वरमध्ये अनुक्रमे 400 आणि 480 मिमी पावसाची नोंद झाली. एका तासात 100 मी.मी पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते, असे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Weather update today : कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे, IMD च्या अंदाजाने धाकधूक कायम

Satara Rain | साताऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद, कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?

(Water level increases in Pawna Dam in Maharashtra)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ