AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा राज ठाकरे यांना टोला, सहा महिन्यांत विचार, भूमिकेत बदल?

ते जाऊ द्या. पण दुसरेचं मुख्यमंत्री इकडे येतायेत.

अजित पवार यांचा राज ठाकरे यांना टोला, सहा महिन्यांत विचार, भूमिकेत बदल?
अजित पवार यांचा निशाणा कुणाकडं?
| Edited By: | Updated on: Oct 28, 2022 | 5:45 PM
Share

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. लाव रे तो व्हिडीओ असं म्हणताच, सहा महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची भूमिका काय होती. विचार काय होते आणि आता काय ? असं म्हणत राज ठाकरे यांचं नाव न घेता अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

महापालिकेच्या मिळकत करासंदर्भात विचारता अजित पवार म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत घड्याळ चालवा. मी दोन मिनिटांत प्रश्न सोडवतो. शिंदे, फडणवीस सरकारमधील कोण नाराज आहे, मला माहिती नाही. जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं. एवढं त्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असंही अजित पवार म्हणाले.

पुण्यातल्या एअरबससंदर्भात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितिनं 8 सप्टेंबर 2021 ला 295 विमान खरेदी करण्याची परवानगी दिली होती. हे केंद्र सरकारचं सांगतोय. दिवाळीला मी बारामतीला होतो. जनता पाहते तशा मिही बातम्या पाहतो. लष्करी विमानं निर्माण करणारी उत्तर प्रदेश हे भाजपशासित राज्यात प्रयत्न होते, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रकल्प आता बडोद्याला जाणार आहे. उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्टीट केलं. उद्योगमंत्री काय बोलले. हा प्रकल्प गेला तर दुसरा आणू. मोठा आणू हा तर गेला. दिल्लीला जाऊन काय केलं. शेवटी हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. त्यानं सांगायचं यांच्यामुळे गेला आणि आम्ही सांगायचं त्यांच्यामुळे गेला.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आम्ही चांगलं वातावरण निर्माण करू. ते जाऊ द्या. पण दुसरेचं मुख्यमंत्री इकडे येतायेत. एक तर आले आणि म्हटले बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी इथं राहिले, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....