AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना मार्गदर्शन म्हणतात ते कोण आहेत पुणे शहरातील व्यक्तीमत्व

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या लोकांचा प्रभाव आहे, त्यात पुणे शहरातील एक व्यक्तीमत्व आहे. आपल्या शंभराव्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उल्लेख करत कौतूक केले होते.

PM Narendra Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना मार्गदर्शन म्हणतात ते कोण आहेत पुणे शहरातील व्यक्तीमत्व
narendra modi and laxmanrao inamdarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 17, 2023 | 1:40 PM
Share

पुणे | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपकडून ‘सेवा ही संगठन ‘ हा उपक्रम आजपासून सुरु केला आहे. हा उपक्रम महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच 2 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून एकही दिवस सुटी घेतली नाही. नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुणे शहरातील एका वकीलाचा समावेश आहे.

‘मन की बात’मध्ये केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी वयात समर्पण भावनेने आणि मेहनतीने कोणतेही काम सुरु केले. संघ प्रचारक असो की पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक कामात त्यांनी आपला प्रभाव दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात केला होता. शंभराव्या ‘मन की बात’ मध्ये बोलताना त्यांनी पुणे शहरातील एका वकीलाचा उल्लेख केला होता.

कोण आहेत ते वकील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या वकीलांचे नाव लक्ष्मणराव इनामदार आहे. मोदी यांनी त्यांना आपले मार्गदर्शक म्हटले होते. त्यांचा जन्म 1917 मध्ये पुणे जिल्ह्यातील खटव गावात झाला. 1943 मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर ते संघात सक्रीय झाले. 1960 मध्ये नरेंद्र मोदी यांची त्यांच्याशी पहिली भेट झाली. त्यावेळी नरेंद्र मोदी फक्त दहा वर्षांचे होते. तेव्हा इनामदार गुजरातमध्ये प्रचारक होते. ती त्यांची पहिली भेट ठरली.

नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभाव

नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष्मणराव इनामदार यांच्या भाषणाचा प्रभाव झाला. त्यामुळे नरेंद्र मोदी संघाचे काम करु लागले. कठोर शिस्त, परिश्रम, समर्पण आणि मुद्द्यांवरची पकड ही गुण नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडूनच घेतले. 2008 मध्ये प्रसिद्ध झालेले ‘ज्योतिपुंज’ पुस्तकातही यासंदर्भात उल्लेख केला गेला आहे. इनामदार यांचे 1984 मध्ये निधन झाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.