AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपला होणारा पती केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील तरुण केतन अग्रवाल याची हत्या त्याचीच होणारी पत्नी सिया गोयलने केली आहे, या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडलं असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

आपला होणारा पती केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? धक्कादायक माहिती समोर
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 10:09 PM
Share

पुणे जिल्ह्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावरून पडून 26 वर्षांच्या केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचं लग्न आलं होतं. तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता, तिथेच ही दुर्घटना घडली. सुरुवातीला केतन फोटो काढण्यासाठी गेला आणि पाय घसरून पडला असाच सर्वांचा समज झाला होता, परंतु त्यानंतर प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. केतनची होणारी पत्नी सिया गोयलनचे तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचना, त्याला आपला वाढदिवसाचं निमित्त करून लोहगडावर बोलावलं आणि संधी मिळताच त्याला लोहगडावरून खाली ढकलून दिलं. केतन 400 फूट दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 18 जून रोजी ही घटना घडी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, सिया गोयलने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला?

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार लोहगड किल्ला हा त्या परिसरातील इतर ठिकाणांपेक्षा तब्बल 600 फूट उंच आहे. या किल्ल्याचं बांधकाम उभ्या दगडांमध्ये असून, या किल्ल्याच्या परिसरात अनेक खोल दऱ्या आहेत. एवढंच नाही तर या किल्ल्यावर असे अनेक भाग आहेत, जिथे पर्यटक देखील सहसा फिरकत नाहीत, सुनसान असतात. अशा ठिकाणावरून केतनला धक्का देणं हे खूप सोप काम होतं. तसेच ठरलेल्या प्लानिंगनुसार तसा बनाव करणं देखील फार सोप होतं, या सर्वांचा विचार करून सिया गोयलने आपल्या होणाऱ्या पतीच्या हत्येसाठी लोहगडची निवड केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे प्रकरण सध्या राज्यभर चांगलच गाजत आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल हे आपल्या मुलाच्या आठवणीने व्याकूळ झाले आहेत. माझा मुलगा मा‍झ्या म्हातारपणाचा आधार होता, मला अशी आशा होती, की माझा मुलगा आयुष्यभर माझ्यासोबत राहील, परंतु माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेण्यात आला आहे, अशा शब्दात केतनच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत