Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं ‘पंजाब हॉस्पिटल’ करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!

देशात आम आदमी पक्षाची सत्ता असलेले दिल्ली हे  पहिले राज्य असून आता पंजाब विधानसभेवरही आपला बहुमत मिळाले आहे. आपने या निवडणुकीत 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला असून विरोधकांना चांगलीच धूळ चारली आहे. आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत जणू क्रांतीच घडवून आणली अशी चर्चा आहे.

Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं 'पंजाब हॉस्पिटल' करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!
Image Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 2:10 PM

चंदिगडः दिल्लीत सत्ता हाती आल्यानंतर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवला, आता पंजाबची सत्ता (Punjab Government) हाती आल्यानंतर येथेही प्रगतीशील सरकार असेल, असं आश्वासन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दिले होते. जिथं महिला सुरक्षित असतील. विद्यार्थ्यांना शिक्षणाची पुरेशी साधनं असतील आणि विशेष म्हणजे अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था असेल, असा भारत निर्माण करायचाय, असं म्हणणाऱ्या केजरीवाल यांनी हे कृतीत उतरवून दाखवण्याचंही ठरवेलं दिसतंय. पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला असून आता पंजाबमध्ये आप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. विशेष म्हणजे काल लागलेल्या निवडणूक निकालांनुसार, पंजाबमध्ये तब्बल 12 डॉक्टर उमेदवार आपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. अर्थातच उच्चशिक्षित असल्यामुळे या डॉक्टरांना पंजाबमधील भावी मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा केली जातेय. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभेचं ‘पंजाब हॉस्पिटल’ करून टाकलंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पंजाब विधानसभेवर कोण-कोण डॉक्टर?

पंजाब विधानसभेत विजयी झालेल्या डॉक्टरांची नावं पुढीलप्रमाणे- – डॉ. काश्मीर सिंग सोहल- तरण तारण मतदारसंघ – डॉ. चरणजीत सिंग- चामकौर साहिब मतदारसंघ – डॉ. इंदरबीर नीज्जेर- अमृतसर पूर्व मतदारसंघ – डॉ. बलजित कौर – मलौत मतदारसंघ – डॉ. विजय सिंगला- मनसा मतदारसंघ – डॉ. अमनदीप कौर अरोरा- मोगा मतदारसंघ – डॉ. रवज्योत सिंग- शाम चौरसी मतदारसंघ – डॉ.बलबीर सिंग- पटियाला ग्रामीण मतदारसंघ हे सर्व डॉक्टर्स आम आदमी पक्षाच्या तिकिटावरून विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर काँग्रेसच्या तिकिटावर देखील डॉ. राज कुमार छब्बेवाल, डॉ. नच्छातार पाल हे बसपाच्या तिकिटावरून आणि डॉ. शुकविंदर कुमार सुखी हे एसएडी पक्षाकडून निवडून आले.

आपची सत्ता असलेले दुसरे राज्य पंजाब

देशात आम आदमी पक्षाची सत्ता असलेले दिल्ली हे  पहिले राज्य असून आता पंजाब विधानसभेवरही आपला बहुमत मिळाले आहे. आपने या निवडणुकीत 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला असून विरोधकांना चांगलीच धूळ चारली आहे. आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत जणू क्रांतीच घडवून आणली अशी चर्चा आहे. आपने भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केलं आहे. प्रगतीशील विचारांचा पक्ष म्हणून आम आदमी पार्टीची प्रतिमा आहे. आता पंजाब विधानसभेवर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात तब्बल 12 डॉक्टर्स निवडून आले आहेत. राजकारणात उच्चशिक्षितांचा समावेश होणे ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब समजली जाते. त्यामुळे हा बदल इतर राज्यांनाही हवा-हवासाच आहे.

इतर बातम्या-

अरे या या या… गुलाबराव, अबू आझमी, सत्तारांना बोलावलं, महाजनांंनी ‘विजयाचा’ पेढा भरवला

अर्थमंत्री, मुख्यमंत्री विधानभवनात दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.