साधेपणाने लग्न झाले, त्यांना पोर झाली नाहीत का?… राधाकृष्ण विखे पाटील यांचे थेट विधान, दुष्काळाच्या..
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दुष्काळाबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधान केले. साधा लग्नाबद्दल त्यांनी हे विधान केले. विखे कुटुंबातील वादही सध्या पुढे आलाय.

राधाकृष्ण विखे पाटील गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. विखे कुटुंबातील वाद पुढे आला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांची मुलगी थेट स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिला. मात्र, नीला विखे यांनी म्हटले की माझा आणि त्यांचा संबंध गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अजिबात नाही. आमच्या साधे बोलणेही होत नाही. मी भारतात जाते पण मी त्यांना भेटत नाही. आता माझ्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी ते आले. राज्यात दुष्काळ आहे. त्यात आमच्या कुटुंबाचा वाद का चर्चेत आला, असल्याचे म्हणते सुजन विखे यांनी टीका केली. त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी असे काही विधान केले की सर्वांनाच मोठा धक्का बसला.
राधाकृष्ण विखे पाटील थेट म्हटले की, दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे डामडौलाने लग्न न करता साध्या पद्धतीने लग्न करा… कोविडमध्ये साधेपणाने लग्न झाले, त्यांना पोर झाली नाहीत का? जो मोठेपणा करता तो यावर्षी तरी थांबवा अशी माझी विनंती… पाऊस कमी आहे… थेट कोविडमध्ये लग्न साधेपणाने झाले त्यांना पोर झाली नाहीत का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी विखेंच्या या विधानानंतर भुवया उंचावल्या आहेत. यासोबतच विखे पाटील यांनी म्हटले की, तुकाराम मुंडे यांच्यामुळे दूधाची भेसळ थांबली, त्यामुळे दुधाचे दर वाढले… दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलास मिळाला आहे.
पुढे दुष्काळाबद्दल बोलताना विखे पाटील यांनी म्हटले की,मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलंय.. एनडीआरएफच्या नाॅर्मपेक्षा जास्त मदत करण्याची सरकारची भुमिका आहे. चार पाच दिवसात आढावा घेतला जाईल. विरोधक दुष्काळाचेही राजकारण करत आहेत हे दुर्दैव आहे. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहीला नाही. त्यांच्याकडे लोकांचा आणि मुद्दयांचा दुष्काळ आहे.
