AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींचा EVM विरोधात लाँग मार्च, महाराष्ट्रातील ‘या’ गावातून करणार सुरुवात

काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून EVM मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती.

राहुल गांधींचा EVM विरोधात लाँग मार्च, महाराष्ट्रातील 'या' गावातून करणार सुरुवात
राहुल गांधीं
| Updated on: Dec 06, 2024 | 12:00 PM
Share

Rahul Gandhi Markadwadi Long March : राज्यातील सत्तास्थापनेचा घोडेबाजार अखेर संपला आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी हा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंरबला जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यावरुन आता विरोधक राज्यभरात ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवताना दिसत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यांनी EVM ची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. या घटनेनं राज्यसह देशभरात मारकडवाडी चर्चेचा विषय ठरले होते. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली होती. यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवरील मतदान करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले.

सोलापुरात ईव्हीएम विरोधात संताप

यानतंर आता सोलापुरातील मारकडवाडीतून एक मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे. हा लाँग मार्च ईव्हीएम विरोधात असणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून EVM मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.

ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न

या आंदोलनावेळी महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारडवाडीतून लॉन्ग मार्च काढणार आहेत. मारकडवाडी या ठिकाणी ईव्हीएमविरोधात पडलेली ठिणगी देशभर वनवा पेटवेल, असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.

वंचितकडूनही जनआंदोलनाची हाक

दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या 3 ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी