मुंबई-पुणे हायवेवर चालत्या लक्झरी बसला आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

खालापूर टोलनाक्याजवळ मुंबईच्या दिशेने जाताना या चालत्या लक्झरी बसने रस्त्यात पेट घेतला.

मुंबई-पुणे हायवेवर चालत्या लक्झरी बसला आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
| Updated on: Dec 26, 2020 | 7:53 AM

रायगड : मुंबई-पुणे हायवेवर खाजगी लक्झरी बस पूर्ण जळुन खाक झाली आहे (Private Luxury Bus Burned). रायगड येथील खालापूर टोलनाक्यापासुन साधारण दीड किमी अतंरावर मुबंई दिशेला येणाऱ्या मार्गावर ही घडली घटना. सुदैवाने बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने कुठलीही जिवीतहानी झाली नाही (Private Luxury Bus Burned).

खालापूर टोलनाक्याजवळ मुंबईच्या दिशेने जाताना या चालत्या लक्झरी बसने रस्त्यात पेट घेतला. सुदैवाने या गाडीत कुणीही प्रवाशी नसल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच, बसचा चालकही सुखरुप बचावला आहे.

या घटनेची माहिती मिळताच आयआरबी यत्रंणेच्या अग्नीशामक दलाच्या दोन गाड्या, खोपोली नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. या गाडीला आग का लागली असावी याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुबंई-पुणे हायवेवर चालत्या बसने पेट घेतल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक थांबली होती. काही काळ मुबंई कडे येणारी वाहतूक यामुळे प्रभावित झाली. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवताच वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत झाली. याप्रकरणी खालापूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

Private Luxury Bus Burned